शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात हुडहुडी..पारा ६ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST

डिसेंबरच्या सुरुवातीला ढगाळ हवामान आणि मध्येच रिमझिम पाऊस अशी स्थिती होती. त्यामुळे काही ठिकाणी अति उकाडा तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. नोव्हेंबर महिन्याअखेरीस थंडीची चाहूल नव्हती. या आठवड्यात थंडी पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

ठळक मुद्देशेकोटीच्या संख्येत वाढ : दैनंदिन कामावरही जाणवतोय परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. पारा ६ अंशापर्यंत घसरला असून सर्वत्र हुडहुडी वाढली आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या बोचऱ्या थंडीला आता सुरुवात झाली आहे. या बोचऱ्या थंडीमूळे लाखांदूर तालुक्यातील सोनी गाव परिसरात शनिवारला चार जणांचा मृत्यू झाला आहे.डिसेंबरच्या सुरुवातीला ढगाळ हवामान आणि मध्येच रिमझिम पाऊस अशी स्थिती होती. त्यामुळे काही ठिकाणी अति उकाडा तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. नोव्हेंबर महिन्याअखेरीस थंडीची चाहूल नव्हती. या आठवड्यात थंडी पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.सध्या जिल्ह्यात वातावरणामध्ये गारठा निर्माण झाला आहे. उकाडा आणि पावसाने हैराण झालेले नागरिक थंडीची वाट पाहात होते. यावर्षी थंडी येणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. आता थंडीची चाहूल लागल्यामुळे काहीसा दिलासा आहे. रविवारचे किमान तापमान ६ अंश तर कमाल तापमान २२ अंश नोंदविण्यात आले आहे. रात्री शीतलहरीमुळे थंडीचा परिणाम अधिक जाणवायला लागले आहे.अनेक ठिकाणी नागरिकांनी शेकोटी पेटवून थंडीचा आनंद लुटतानाही पाहायला मिळत आहे. थंडीची लाट आणखी काही दिवस राहणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सजग राहावे असे आवाहनही आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.गुलाबी थंडीत नववर्षाचे स्वागतनवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे सगळी तरुणाई व ज्येष्ठही नवीन वर्षाच्या स्वागत कशा प्रकारे करायचे या तयारीला लागले असून, नवे बेत आखत आहेत. तर नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची सजावट करण्यात येत आहेत. तर अनेक ठिकाणी ऑर्केस्ट्रा तसेच नृत्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्या वर्षाला अखेराचा निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी युवक-युवती विविध कार्यक्रमाचे आयोजन ३१ डिसेंबर रोजी करीत असतात. पूर्वी अनेकांच्या घरावरील छतावर नववर्षाच्या स्वागताच्या पार्टी दिसून येत होत्या. मात्र आता हे प्रकार बंद असल्याचे दिसून येत आहेत. अनेक युवक आऊटिंग, सिनेमा, हॉटेलिंग, धाबा, दुरवर फिरायला जाणे अशाप्रकारचे सेलिब्रेशन करीत असल्याचे आढळून येतात. नवीन वषार्चे स्वागत डान्स आणि मस्तीने करण्यासाठी म्युझिक बॅन्ड, डीजे, आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अनेक हॉटेल्समध्ये करण्यात येणार आहे. डान्स फ्लोअरची खास व्यवस्था केली आहे.

टॅग्स :weatherहवामान