शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

जिल्हा रूग्णालयात परिचारिकांचा गौरव

By admin | Updated: May 18, 2016 00:37 IST

जिल्हा रुग्णालय भंडारा येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला.

भंडारा : जिल्हा रुग्णालय भंडारा येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक आ. रामचंद्र अवसरे याच्या हस्ते पाहुणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनीता बडे व डॉ. पीयूष जवकाळ होते. यानंतर परिचारिकातर्फे नाट्यछटा सादर करण्यात आली. विषय परिचर्या आणि त्याची व्याप्ती यामध्ये रंजना नंदनवार, भावना सुर्यवंशी अ.प. सोनाली फटकाळ व परिचारिका प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला. परिचारिका व प्रशिक्षणार्थींना बक्षीस वितरण प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले. रांगोळी स्पर्धा सीमा कुरई प्रथम, मोनाली काटवले व दिव्याश्री चव्हाण द्वितीय. पोस्टर स्पर्धा कामिनी पुडके, रंजना नंदनवार. स्लोगन स्पर्धा पुष्पा उईके, रंजना नंदनवार. निबंबध स्पर्धा संतोष धानोरे, कामिनी पुडके. प्रश्न संच आशा टांगले, सचिन साठवणे संचालन मोनिका नाहर पाठ्य निर्देशिका यांनी केले.राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत प्लोरेंन्स नाईटिंगेल पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांचे संचालन व प्रास्ताविक चंद्रकुमार बारई जिल्हा समूह संघटक यांनी केले. कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका, आरोग्य सहायीका व अधिपरिचारिका ते अधिसेविका यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या स्वरूपात अनुक्रमे रूपये ४०००, ३००० व २००० तसेच सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये आरोग्य सहायीका एलएचव्ही पुष्पा मेश्राम, प्रा. आ. केंद्र सरांडी प्रथम क्रमांक, कविता चोपकर प्रा. आ. केंद्र वरठी द्वितीय क्रमांक, डी.एन. टेंभुर्णीकर प्रा. आ. केंद्र विर्शी तृतीय क्रमांक यांना मिळाला तर आरोग्य सेविका प्रथम क्रमांक अश्विनी एल बांते, उपकेंद्र लाखोरी प्रा.आ. केंद्र सालेभाटा. द्वितीय क्रमांक वी.डी. भारती, उपकेंद्र वाकेश्वर प्रा. आ. केंद्र पहेला, तृतीय क्रमांक एन.एन. वंजारी उपकेंद्र मानेगाव प्रा. आ. केंद्र पहेला यांना मिळाला. अधिपरिचारिका ते अधिसेविका या संवर्गातून वत्सला मानमोठे सहायक अधिसेविका जिल्हा रुग्णालय भंडारा प्रथम, विशाखा बोरकर अधिपरिचारिका ग्रामीण रुग्णालय पवनी द्वितीय, पुष्पा गिरीपुंजे परिसेविका जिल्हा रुग्णालय भंडारा तृतीय यांना मिळाला. कार्यक्रमाला प्रकाश बालमांदरे, सचिन मते यांनी सहकार्य केले. सुनिता बडे यांनी एकमेका सहाय्य करू अवघे धरू संपन्न असे म्हणून परिचारिकांची प्रशंशा केली. आ. अवसरे म्हणाले, परिचारिका की देवदुतासारखी आहे. रुग्ण हे तिच्या मोठ्या व लहान भावासारखे आहेत. तिचे कार्य समाज मान्य असून ती रात्रंदिवस कष्ट करून सेवा देणारी देवदूत आहे. संचालन आशा टांगले यांनी केले. आभार प्रदर्शन भावना सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. वत्सला मानमोठे, वीणा पाटील, मोनिका नाहर, रेखा गिरी, ज्योती चौधरी, मंजुषा नेवारे, रेखा वासनिक, मायादेवी वासनिक, साधना नाग, पुष्पा उईके, सचिन साठवणे, परिक्षक म्हणून डॉ. प्राची पातुरकर, डॉ. ज्योती कुकडे, अहारतज्ञ विनीता चकोले हे होते. (प्रतिनिधी)