शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

ऐतिहासिक शिलालेख संवादाचे प्रभावी माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:16 IST

राष्ट्रीय स्मारक आणि महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण स्मारक व गडकिल्ल्यावरील इतिहासकालीन शिलालेख संवादाचे प्रभावी माध्यम आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने या शिलालेखावरील संवादाचा अभ्यास करुन तयार केलेली छायाचित्रे प्रदर्शनी इतिहासाचा दुर्मिळ ठेवा आहे. विशेषत: अरबी व फारशी भाषेतील शिलालेख व त्याचा अनुवाद या विषयी या प्रदर्शनीत उत्तम छायाचित्र आहेत. ही प्रदर्शनी आर्वजून बघावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी केले.

ठळक मुद्देविकास ढोमणे : पटेल महाविद्यालयात शिलालेख प्रदर्शनाचे उद्घाटन, तीन दिवस चालणार प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: राष्ट्रीय स्मारक आणि महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण स्मारक व गडकिल्ल्यावरील इतिहासकालीन शिलालेख संवादाचे प्रभावी माध्यम आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने या शिलालेखावरील संवादाचा अभ्यास करुन तयार केलेली छायाचित्रे प्रदर्शनी इतिहासाचा दुर्मिळ ठेवा आहे. विशेषत: अरबी व फारशी भाषेतील शिलालेख व त्याचा अनुवाद या विषयी या प्रदर्शनीत उत्तम छायाचित्र आहेत. ही प्रदर्शनी आर्वजून बघावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी केले.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण पुरालेख शाखा नागपूर व जे.एम. पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्मारक आणि महाराष्ट्रातील महत्वपूर्ण स्मारकावर अरबी आणि फारशी शिलालेख यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनीच्या उदघाटन कार्यक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.अरबी, फारशी शिलालेख छायाचित्र प्रदर्शनी व सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुरालेख कार्यालयाचे सहायक अधीक्षक शहानवाज आलम, आयक्युएसीचे समन्वयक डॉ. कार्तिक पनीकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सिध्दार्थ मेश्राम उपस्थित होते.पुरातन काळात संदेश देण्यासाठी शिलालेखाचा वापर केला जायचा. हे शिलालेख राष्ट्रीय स्मारक व किल्ले या ठिकाणी मोठया प्रमाणात पाहायला मिळतात. या शिलालेखावर अरबी आणि फारशी भाषेतील संदेश कोरले असायचे. या शिलालेखावरील भाषेचा पुरातत्व शिलालेख विभागाने अभ्यास करुन त्याची छायाचित्र प्रदर्शनी तयार केली ही प्रदर्शनी इतिहासाचा अनमोल ठेवा आहे, असे डॉ. ढोमणे यांनी सांगितले. राष्ट्रीय स्मारकांना पर्यटक म्हणून भेटी देतांना या शिलालेखांचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे सांगून डॉ. ढोमणे म्हणाले, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीचे अवलोकन करुन आपला इतिहास व भाषा समजून घ्यायला हवी. विशेषत: इतिहास शाखेच्या विद्यार्थ्यांनी या विषयीच्या माहिती आपल्या संदर्भासाठी ठेवाव्या.शिलालेखावरील अरबी फारशी भाषेचा अभ्यास करुन तयार केलेली छायाचित्र प्रदर्शनी इतिहासाचा वारसा सांगणारी आहे. भाषेचा प्रभावी वापर या शिलालेखावर करण्यात आला. संवादाचे माध्यम म्हणून शिलालेख आजही अजरामर आहेत, असे रवी गिते यांनी सांगितले. शिलालेख हे भारताच्या उज्ज्वल परंपरा व संस्कृतीचे प्रतिक असून पुरातत्त्व विभागाने या छायाचित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून ही परंपरा समाजासमोर ठेवली आहे. ही अभिनंदनीय बाब आहे असे ते म्हणाले.पुरातत्त्व विभागाने शिलालेखावरील अरबी व फारशी भाषेचा अभ्यास करुन हे छायाचित्र प्रदर्शनी तयार केली आहे. या प्रदर्शनीत लावलेल्या छायाचित्राची व भाषेची सविस्तर माहिती प्रदर्शनामध्ये येणाऱ्या नागरिकांना देण्याची सोय केली आहे, असे शहानवाज आलम यांनी सांगितले. ही प्रदर्शनी १३ ते १५ आॅगस्ट सकाळी ९ ते ४ वाजेपर्यत जे.एम. पटेल महाविद्यालयामध्ये सर्व नागरिकांना खुली असणार आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून देशाच्या व महाराष्ट्राच्या स्मारकांचा इतिहास लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केल्या गेला आहे.जे.एम. पटेल महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाच्या नवनियुक्त कार्यकारणींनी आज पदभार स्विकारला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिध्दार्थ मेश्राम यांनी केले.संचालन सुश्रृती काळबांधे, अंजली चोपडे यांनी तर ऋचिका निनावे हिने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ.डी .एच. राऊत, प्रा.अनिल भांडारकर, प्रा.विजया कन्नाके, प्रा.ममता राऊत, डॉ. निशा पडोळे यांच्यासह प्राध्यापक तथा कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.