शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

तुमसरातील ऐतिहासिक ५२ दारी वास्तू भुईसपाट

By admin | Published: September 17, 2014 11:34 PM

भंडारा जिल्ह्यातील जूनी ब्रिटीशकालीन तुमसर नगरपरिषदेला सुमारे १४९ वर्षे झाली आहेत. सुमारे १३० वर्षापूर्वी जुने गंज बाजाराची भव्यदिव्य वास्तू नगरपरिषदेसमोर तयार करण्यात आली होती.

१३० वर्षे जुनी इमारत : कच्छ प्रांतातील वास्तू नामशेषतुमसर : भंडारा जिल्ह्यातील जूनी ब्रिटीशकालीन तुमसर नगरपरिषदेला सुमारे १४९ वर्षे झाली आहेत. सुमारे १३० वर्षापूर्वी जुने गंज बाजाराची भव्यदिव्य वास्तू नगरपरिषदेसमोर तयार करण्यात आली होती. ती ऐतिहासिक तथा भव्यदिव्य ५२ दारी वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमणाचा येथे विळखा होता. ऐतिहासीक वास्तु जतन करून इतर बांधकाम करण्याची येथे गरज होती.तुमसर नगरपरिषदेची स्थापना २७ मे १८६५ मध्ये झाली असे दस्तऐवजात नमूद आहे. तुमसर नगरपरिषदेचे पहिले अध्यक्ष मुहूर्त जनाब मौलाना बख्त हे होते. त्यांचा कार्यकाळ दस्तऐवजात नमूद आहे. आतापर्यंत २७ नगराध्यक्षांनी या इमारतीत आपला कार्यकाळ घालविला. गुजरातच्या कच्छ प्रांतातून पहिले नगराध्यक्ष मुर्हूम जनाब मौला बख्त आले होते. त्यांनी तुमसर नगर परिषदेचे किल्ल्यासारखे प्रवेशद्वार तयार केले होते. अतिशय देखणे प्रवेशद्वार येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. आजही ते दिमाखाने उभे आहे. या प्रवेशद्वाराच्या बांधकामाकरिता कच्छमधून कारागीर आणण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष बख्त यांनी नगरपरिषदेच्या समोरील मोकळ्या जागेत ५२ दारी भव्यदिव्य वास्तु तयार केली होती. सतत तीन ते चार वर्षे या इमारत बांधकामाला लागले होते. दगड, विटा व चुनखडीने ही वास्तु तयार झाली होती. गुजरात राज्यात भव्य कमानी व भरपूर दारे असलेल्या इमारती आजही आहेत. येथे पुढे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत होती. कृषी मालाची आवक वाढल्याने २२ वर्षांपुर्वी बाजार समिती भंडारा रोड व शहराबाहेर नेण्यात आली.येथे तुमसरेश्वर महागणपतीचे मंदीर पश्चिम दिशेला आहे. ५२ दारी व मंदीर परिसरात किरकोळ फूटपाथ दुकानदारांनी अतिक्रमण केले होते. ८० ते ९० दुकाने येथे होती. या दुकानामुळे मंदीरात व बाजारात जाताना नागरिकांना त्रास व्हायचा. रस्त्यावरच वाहने उभी ठेवली जायची. वाहतुकीची कोंडी येथे मोठ्या प्रमाणात होत होती. दर मंगळवारी तुमसरात आठवडी बाजाराच्या दिवशी तर प्रचंड गर्दी व्हायची. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी येथील अतिक्रमण काढणे रखडले होते. नवीन नगराध्यक्षांनी सर्व अतिक्रमण तात्काळ काढले. सर्व फूटपाथ दुकानदारांवर अन्याय होणार नाही, अशी भूमिका घेवून ८ बाय ८ चे तात्पुरते दुकान देण्याची घोषणा दिली. त्यानुसार कारवाई सुरू आहे.ऐतिहासीक वारसा वास्तु येथे जतन करण्याची मात्र गरजेचे होते. ती वास्तु भूईसपाट करण्यात आली. वास्तू तज्ञांचा सल्ला घेवून त्यात बदल करून नव्याने इमारत नुतनीकरणाची गरज होती. अनेक वर्षे वास्तु रिकामी असल्याने अनेक ठिकाणी ती खचली होती. एखादा मोठा अपघात होण्याची येथे शक्यता होती. आता येथे मोकळा श्वास घेता येतो, परंतु हा श्वास किती वर्षे घेता येईल हा मुख्य प्रश्न आहे. राजकीय इच्छाशक्ती व निर्णयाला तुमसरकरांनी साथ देणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)