शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
4
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
5
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
6
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
7
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
8
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
9
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
10
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
11
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
12
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
13
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
14
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
15
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
16
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
17
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
18
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
19
"१७ एप्रिलला आणखी एका महिलेचा कॉल आला अन्.."; क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप
20
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

पालोर्‍यात इसमाचा खून

By admin | Updated: June 7, 2014 23:44 IST

ज्या कामासाठी पैसे घेतले होते, ते काम केले नाही आणि पैसेही परत का देत नाही, या कारणावरुन झालेल्या भांडणात तिघांनी मिळून एका इसमाचा खून केला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ९.३0 वाजताच्या

पैशासाठी भांडण : मोहाडी पोलिसांनी केली तिघांना अटकभंडारा : ज्या कामासाठी पैसे घेतले होते, ते काम केले नाही आणि पैसेही परत का देत नाही, या कारणावरुन झालेल्या भांडणात तिघांनी मिळून एका इसमाचा खून केला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे घडली.  प्रभू ऊर्फ कारु ईस्तारी आगाशे (५0) रा.पालोरा असे मृताचे नाव असून याप्रकरणी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कैलाश बांते (३८), ग्रामपंचायत सदस्य वसंत राऊत (४५) आणि अरविंद कळाम (३४) रा.पालोरा अशी आरोपींची नावे आहेत. अरविंद कळाम याने प्रभू आगाशे याला जंगलातून बांबू आणण्यासाठी ६0 रुपये दिले होते. मात्र प्रभू आगाशे याने ते काम पूर्ण केले नाही आणि घेतलेले पैसेही परत दिले नाही. त्यामुळे शुक्रवारला सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास पालोरा येथील डेकाटे यांच्या पानटपरीत आगाशे आणि कळाम यांच्यात पैशावरून भांडण सुरू झाले. यावेळी कळाम याच्यासोबत तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कैलाश बांते, ग्रामपंचायत सदस्य वसंत राऊत हे होते. वाद वाढल्यानंतर या तिघांनी प्रभूच्या डोक्यावर जबर मारहाण केली. यात तो रक्तबंबाळ झाला. याही स्थितीत प्रभू हा घरी पोहोचला. घडलेली घटना पत्नीला सांगितली. त्यानंतर हातात रॉड घेऊन तो घराबाहेर गेला. दारु दुकानात जाऊन दारु ढोसली. त्याचवेळी कळाम, बांते व राऊत हेदेखील दारुच्या दुकानात होते. त्यानंतर हे तिघेही प्रभूवर पाळत ठेऊन होते. प्रभू तिथून निघाल्यानंतर खडकी-पालोरा मार्गावर रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या या तिघांनी प्रभूच्या डोक्यावर व पाठीवर काठीने जबर मारहाण केली. यात प्रभू रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. त्यानंतर हे तिघेही तिथून पळाले.खडकी-पालोरा मार्गावर कुणीतरी इसम रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याची माहिती एका इसमाने पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून प्रभू आगाशे याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. दरम्यान वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृताची पत्नी गीता आगाशे यांच्या तक्रारीवरून रात्रीच या तिन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्याविरुद्ध भादंवि ३0२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून बयान नोंदविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास मोहाडीचे पोलीस निरीक्षक गुंजवटे, सहायक पोलीस निरीक्षक चौधरी, करडीचे सहायक फौजदार अश्‍विन मेहर करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)