शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

त्रेता युगाच्या महानायकाचा जिल्ह्यात सर्वत्र जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:01 IST

भंडारा शहरातील प्रत्येक चौक भगव्या पताकांनी सजविण्यात आले होते. चौकाचौकांत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. येथील गांधी चौकात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भंडाराचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गांधी चौक पताकांनी सजविण्यात आला होता.

ठळक मुद्देभगव्या पताकांनी सजले चौक, रस्त्यारस्त्यांवर रांगोळ्या, गांधी चौकात महाआरती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राममंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त जसजसा जवळ येत होता तसतशी भाविकांची उत्सूकता शिगेला पोहचली. अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले आणि भंडारा शहरासह जिल्ह्यात श्रीराम नामाचा जयघोष झाला. फटाक्यांची आतषबाजी करून रामभक्तांनी स्वप्नपूर्तीचा आनंदोत्सव साजरा केला.भंडारा शहरातील प्रत्येक चौक भगव्या पताकांनी सजविण्यात आले होते. चौकाचौकांत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. येथील गांधी चौकात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भंडाराचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गांधी चौक पताकांनी सजविण्यात आला होता. १२.४० वाजता अयोध्येत भूमिपूजन झाले आणि फटाक्यांची आतषबाजी सुरु झाली. खासदार सुनील मेंढे, भंडाराचा राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश वंजारी यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी आणि श्रीराम भक्त येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. खात रोडवरील रामायण नगरीत मंगलवेष परिधान करून स्त्री पुरुष एकत्र आले होते. श्रीरामाच्या जयघोषात फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. येथे नगरसेवक संजय कुंभलकर, नगरसेविका साधना त्रिवेदी, संतोष त्रिवेदी आदी उपस्थित होते. बीटीबी सब्जीमंडीत पूजा पाट, शंखनाद करून उत्सव साजरा केला. यासह शहरातील खामतलाव चौकातील बहिरंगेश्वर मंदिर, केशवनगर चौक, शास्त्री चौक, राजीव गांधी चौक, पोस्टआॅफीस चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, हेडगेवार चौक, जलाराम चौक, चांदणी चौक, जिल्हा परिषद चौकासह ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला.भंडारा येथील खामतलाव चौकातील बहिरंगेश्वर देवस्थान परिसरातील राममंदिरात शहरातील श्रीराम भक्तांनी एकत्र येऊन तेथे आरती करून श्रीरामाचे पूजन केले. त्यानंतर शहरातील विविध चौकात जाऊन तेथे लावण्यात आलेल्या श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मोठा बाजार परिसरालगतच्या श्रीराम मंदिराला रोषनाईने सजविण्यात आले होते. येथे आरती करण्यात आली.भंडाऱ्याचे खासदार राममंदिर आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी झाले होते. जोवर राममंदिर निर्माण होणार नाही तोवर शेंडी ठेवण्याचा निर्धार वयाच्या २४ व्या वर्षी केला. राममंदिरासाठी विविध आंदोलनात सहभागी झाले. बुधवारी अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाले. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील मेंढे यांनी आपली शेंडी कापून संकल्पपूर्ती केली.लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. २५ ऑक्टोबर १९९० रोजी पालांदूर येथून कृष्णाजी जांभुळकर, तामेश्वर रणदिवे यांच्या नेतृत्वात २० कारसेवक अयोध्या येथे रवाना झाले होते. त्यांच्या कार्याची आज पालांदूरवासीयांना आठवण झाली. या कारसेवकांचा कार्यक्रमस्थळी श्रीरामाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. कृष्णाजी जांभुळकर, माधव नवखरे या कारसेवकांनी त्यावेळच्या घटनेचा क्रम सांगून आठवणींना उजाळा दिला. सरपंच पंकज रामटेके, दामाजी खंडाईत, उपसरपंच स्वप्नील खंडाईत, तु.रा. भुसारी, माजी सरपंच वैशाली खंडाईत, नितीन रणदिवे यांच्या हस्ते सत्कार केला.जिल्ह्यातील प्रत्येक राममंदिरात श्रीराम भक्तांनी जाऊन श्रीरामाचे पूजन केले. तुमसर येथील रामकृष्ण नगरातील पुरातन राममंदिरात सुंदरकांड, हनुमान चालीसा पठण करण्यात आले. पूजारी राघवेंद्र पांडे यांच्या उपस्थितीत होम हवन करण्यात आले. जवाहरनगर ठाणा येथील टी पॉइंटवर रामभक्त तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी व शंखनाद करून जल्लोष केला. सुंदरकांड पठण करण्यात आले. यासोबतच जिल्ह्यातील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन दिवसभर करण्यात आले होते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर