शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

पोलिसांच्या मदतीने चिमुकलीला मिळाली आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST

सद्रक्षणाय-खलनिग्रणाय हे ब्रीद असलेल्या पोलीस खात्यावर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असते. ही जवाबदारी योग्यरित्या सांभाळत असले तरी अनेकदा त्यांच्यावर टिकेची झोळ उठविली जाते. मात्र पोलिसही एक माणूसच आहे. त्यांचीही एक सामाजिक बांधिलकी आहे. याच सामाजिक बांधिलकीतून एका हरविलेल्या तीन वर्षीय चिमुकलीची आणि आईची भेट घडवून आणली. तुमसर शहर पोलिसांनी शुक्रवारी दिलेल्या माणुसकीच्या या प्रत्ययाने सर्वांनी त्यांना शॉल्यूट केला.

ठळक मुद्देतुमसरची घटना : पोलिसांनी दिला माणुसकीचा परिचय, गल्लीबोळात फिरून ध्वनीक्षेपकावरून सूचना

राहूल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सद्रक्षणाय-खलनिग्रणाय हे ब्रीद असलेल्या पोलीस खात्यावर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असते. ही जवाबदारी योग्यरित्या सांभाळत असले तरी अनेकदा त्यांच्यावर टिकेची झोळ उठविली जाते. मात्र पोलिसही एक माणूसच आहे. त्यांचीही एक सामाजिक बांधिलकी आहे. याच सामाजिक बांधिलकीतून एका हरविलेल्या तीन वर्षीय चिमुकलीची आणि आईची भेट घडवून आणली. तुमसर शहर पोलिसांनी शुक्रवारी दिलेल्या माणुसकीच्या या प्रत्ययाने सर्वांनी त्यांना शॉल्यूट केला.तुमसर शहरातील गांधीनगर नेहरू शाळेच्या पटांगणामागे गुरूवारी सकाळी ९ वाजता एक तीन वर्षीय बालिका रडत होती. येथून जाणाऱ्या अनेकांनी सुरूवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तासभर लोटूनही तिचे रडने थांबत नव्हते. म्हणून काही सुज्ञ नागरिकांनी तिची चौकशी केली. परंतु तिला काहीच सांगता येत नव्हते. मुलगी कुणाची येथे कशी आली असेल, असा विचार येथे उपस्थितांनी सुरू केला. त्यावेळी कुणीतरी पोलीस ठाण्यात माहिती देण्यास सांगितले. त्यावरून तुमसर पोलीस ठाण्यात त्या चिमुकलीला आणण्यात आले. मात्र या चिमुकलीची ओळखच पटत नव्हती. ती काही बोलतही नव्हती. शेवटी ठाणेदार रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार मनोहर शहारे, श्वाती गभने, शेंडे व रोडगे यांनी या मुलीच्या आईचा शोध घेणे सुरू केले. तुमसर शहरातील गल्लीबोळात शोध सुरू झाला. पोलीस वाहनावरील ध्वनीक्षेपकावरून मुलगी हरविल्याची माहिती देणे सुरू केले. एवढेच नाही तर चिमुकलीच्या फोटोचे पत्रक तयार करून शहरातील विविध भागात वितरित करण्यात आले. एका चिमुकलीला घेवून पोलीस आईचा शोध घेत होते.अखेर दुपारच्या सुमारास यश आले. नितीन मेश्राम यांची देवांशी कन्या असून ती कुंभारे नगरात राहत असल्याचे पुढे आले. पोलिसांनी थेट कुंभारेनगर गाठून तिला आई पूजाच्या हवाली केले. आईला पाहताच चिमुकली वेगाने तिच्याकडे झेपावली. पोलिसांनी तब्बल तीन साडेतीन तास चालविलेल्या शोध मोहीमेचे सार्थक झाले. आईच्या डोळ्यातून अश्रूधारा लागल्या. हा हृदयपर्शी प्रसंग पाहून पोलिसांच्या डोळ्याच्या कडाही ओलावल्या.पोलिसांची मानले आभारइकडे पूजा मेश्रामही आपली मुलगी दिसत नाही म्हणून शोध घेत होती. घरासमोर खेळता खेळता ती अचानक भरकटली आणि घराचा रस्ता विसरली. काही सहृदयी व्यक्तींच्या हा प्रकार लक्षात आल्याने ती पोलीस ठाण्यात पोहचली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. आईने मुलीला आपल्या कडेवर घेत डबडबत्या डोळ्यांनी पोलिसांचे आभार मानले. 

टॅग्स :Policeपोलिस