शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:44 IST

तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांतर्फे करण्यात येत आहेत. तर भीषण पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी पायपीट : प्रशासनाची बघ्याची भूमिका, उपाययोजना कागदावरच, रोज सकाळी होतात नळावर भांडणे

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांतर्फे करण्यात येत आहेत. तर भीषण पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहे. प्रशासन मात्र पाणी टंचाई समस्येकडे दुर्लक्ष करीत असून बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील विहिरी आटल्या, बोअरवेल निकामी झाले. पाण्यासाठी दुसरे कोणते स्त्रोत उपलब्ध नाही. तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात अतिरिक्त विहिरी व बोअर अधिग्रहण करण्याची गरज आहे.एप्रिल महिना संपला आहे व मे महिन्याच्या सुरुवात होऊन पंधरा दिवस झाले आहेत. पाणी टंचाईग्रस्त गावात अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाण्यासाठी लोकांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत. परंतु प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. प्रशासन असेच बघत राहणार की काही उपाययोजना करेल, असे प्रश्न नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात उपस्थित केल्या जात आहेत.पाण्याचा अपव्यय टाळाभंडारा : जिल्ह्यातून बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई नसावी, असे वाटत असले तरी पाणी टंचाईची झळ पोहोचते. निसर्गाने भरभरुन दिलेल्या भंडारा शहरात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. याचे परिणाम उन्हाळ्यात जाणवत असले तरी भविष्यात येथील नागरिकाना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाण्याचा पुर्नवापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रत्येकाने पुढे येण्याची हीच वेळ आहे. भंडारा जिल्ह्यात पावसाच्या पाण्याची साठवणूक झाली पाहिजे. पाण्याचा पुर्नवापर वाढला पाहिजे, नाहीतर भविष्यात मोठे जलसंकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. भंडारा शहरासह जिल्हाभरात पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरातील विविध वॉर्डात व्हॉल्व लिकेज आहेत. शहरात काही भागात पाणी येत नाही तर काही भागात पाण्याचा अपव्यय सुरु असतो. पाणी वाहून जात असते. भंडारा शहरातील पाईपलाईन जीर्ण झाली असून नळाला दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिक पाणी टंचाईच्या नावाने ओरडतात. ग्रामीण भागात हातपंपावर लहान मुलांचा खेळ सुरू असतो. जनावरे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात विहीरीचे पाणी वापरले जाते. अंगणातील फरशीवर फवाºयाने पाणी मारले जाते. यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे पाण्याची बचत करणे हे मोठे आव्हान आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई