शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

तीन तालुक्यातील 12 महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 22:18 IST

हवामान खात्याने १३ ऑक्टाेबरपर्यंत येलो अलर्ट दिला असून या पावसाची धास्ती आता शेतकऱ्यांनी घेतली आहे. जिल्ह्यात हलका धान काढणीला आला आहे. अनेक ठिकाणी धान कापणी झाली असून कडपा बांधून शेतात आहे; मात्र दररोज पाऊस कोसळत असल्याने धान कडपा ओल्या होत आहेत. शेतात उभा असलेला धान वादळी पावसाने आडवा झाला आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात पाऊस थांबता थांबायचे नाव घेत नाही. दररोज जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. मंगळवारी दिवसभर आणि बुधवारी पहाटेपर्यंत सर्वदूर पाऊस कोसळला. गत २४ तासांत तीन तालुक्यांसह १२ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून एकट्या भंडारा तालुक्यात तब्बल १३७ मिमी पाऊस कोसळला. तर जिल्ह्यात सरासरी ५५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ऐन धान काढणीच्या वेळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावला जात आहे.जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून एक दिवसाआड पाऊस बरसत आहे. तीन दिवसांपासून तर पाऊस थांबायचे नाव घेत नाही. मंगळवारी सकाळपासून पाऊस कोसळायला सुरुवात झाली. दुपारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर रात्री ११.३० वाजता प्रचंड विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. बुधवारी पहाटेपर्यंत सारखा पाऊस कोसळत होता. अलीकडच्या काळात दसऱ्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची ही पहिलीच वेळ असावी. गत २४ तासात जिल्ह्यात ५५.३ मिमी पाऊस कोसळला असून त्यात भंडारा, मोहाडी आणि तुमसर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. भंडारा तालुक्यातील भंडारा महसूल मंडळात १३७ मिमी, धारगाव ६५.२ मिमी, खमारी ९२.४ मिमी, मोहाडी तालुक्यातील मोहाडी मंडळात ८५.६ मिमी, वरठी ९०.६ मिमी, करडी ८२.५ मिमी, कांद्री ८९.२ मिमी, कान्हळगाव ८८.२ मिमी, आंधळगाव ९०.२ मिमी, तुमसर तालुक्यातील तुमसर मंडळात ८४ मिमी, सिहोरा ६८.२ मिमी, आणि मिटेवानी मंडळात ७१ मिमी पावसाची नोंद झाली.हवामान खात्याने १३ ऑक्टाेबरपर्यंत येलो अलर्ट दिला असून या पावसाची धास्ती आता शेतकऱ्यांनी घेतली आहे. जिल्ह्यात हलका धान काढणीला आला आहे. अनेक ठिकाणी धान कापणी झाली असून कडपा बांधून शेतात आहे; मात्र दररोज पाऊस कोसळत असल्याने धान कडपा ओल्या होत आहेत. शेतात उभा असलेला धान वादळी पावसाने आडवा झाला आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने आणखी दोन दिवसत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. कापलेला धान ओला होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. सततच्या पावसाने धान पाखर होण्याची भीती आहे.ओला दुष्काळ घोषित कराजिल्ह्यात सातत्याने पाऊस कोसळत असून हाताशी आलेला घास हिरावला जात आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज असून धानावर कर्ज फेडण्याची तयारी होती. परंतु पावसाने पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.सिहोरा परिसरात धानाचे नुकसानतुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील चुल्हाड, बपेरा, सिहोरा, येरली आदी गावांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला. संपूर्ण धान पीक जमीनदोस्त झाले आहे. पाऊस सुरु असल्याने धान कापणीत अडचण येत असून वादळी पावसाने धान ओला होवून जमीनदोस्त झाला. साकोली तालुक्यातही मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारा जोरदार पाऊस झाला. लाखनी, मोहाडी तालुक्यात परतीच्या पावसाने  धान पिकाचे मोठे नुकसान झाले असून सततच्या पावसाने आता शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

भंडारा शहरात वीज रात्रभर खंडित

- भंडारा शहरात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह विजांच्या प्रचंड कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. तब्बल तीन तास मुसळधार पाऊस बरसला. रात्री १.३० वाजताच्या सुमारास तर ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. या पावसाने रात्री शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. शहराजवळून वाहणारी वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे.- हलका व मध्यम धान कापणीस आला आहे. १०० ते १२० दिवसांचे धान संपूर्णतः जमीनदोस्त झाले असून, अंकुर येण्याची शक्यता आहे. कापणी झालेले किंवा कापणी योग्य धानाच्या बांधातील पाणी बाहेर काढावे. उताराच्या दिशेने पाण्याची व्यवस्था करावी. कडपा उचलून उंच भागावर ठेवावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

वादळी पावसाने धान जमीनदोस्त

- लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात बुधवारी पहाटे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली. यात हाताशी आलेले धान पीक जमीनदोस्त झाले. शेतात उभे असलेले पीक सडण्याच्या अवस्थेत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. 

नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा

- परतीच्या पावसाने पिकांना झोडपून काढले. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा काढला. परंतु तीनदा नुकसान होऊनही विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा. नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा. खमारी नाल्यावर नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा जिल्हा परिषद सदस्य रजनिश बंसोड, कारधाचे सरपंच आरजू मेश्राम यांनी दिला आहे.

खमारी पुलावर चार फूट पाणी, वाहतूक ठप्प

- जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने धान पीक जमीनदोस्त झाले. हलक्या धानाच्या कळपा पाण्यात ओल्याचिंब झाल्या असून, भंडारा तालुक्यातील खमारी नाल्याच्या पुलावर चार फूट पाणी वाहत होते. खमारी मार्गावरील पूल कमी उंचीचा असल्याने पाण्याखाली आला. दिवसभर वाहतूक बंद पडली होती. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक घरादारांचे नुकसान झाले. मंगळवारला सकाळपासून पावसाने झड लावली. कौलारू घरात पाणी शिरल्याने पडझड झाली. काही घरे कोसळली. शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या हलक्या धानाची कापणी जाेमात सुरू आहे. तर भारी वाणाचे धान लोंबीवर आले आहे. पावसाचे पाणी शिरल्याने ओल्याचिंब कळपांना दुर्गंधी सुटली आहे. कडपा वाळवायच्या कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती