शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अतिवृष्टीची झळ; शेतकरी वळले पीक विम्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 12:27 IST

७९,०८० संख्येने वाढ : यंदा १.९७ लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गतवर्षी खरीप हंगामात १,१८,०९८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढला होता. यंदा हंगामाच्या प्रारंभीच अतिवृष्टी व पुराचा फटका बसला. त्यामुळे यंदा १,९७,१७८ शेतकऱ्यांनी एकूण ८६ हजार ६५९ हेक्टरचा पीक विमा उतरविला आहे. गतवर्षापेक्षा यंदा ७९,०८० शेतकरी संख्या वाढली असून पिकांना सुरक्षा कवच मिळाले आहे; परंतु गतवर्षी पिकांचे नुकसान होऊनही विमा मिळालेला नव्हता. निदान यंदा तरी नुकसानीचा विमा मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

भंडारा जिल्ह्यात दरवर्षी शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशा विपरीत परिस्थितीत पिकांना विम्याचे संरक्षण लाभावे, यासाठी यावर्षी १ लाख ९७ हजार १७८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदविला आहे. पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांत मोहाडी तालुका आघाडीवर आहे. यावर्षी एकूण विमा संरक्षित रक्कम ४१६.०१ कोटी एवढी आहे, तर विमा काढणाऱ्या शेतकऱ्यात कर्जदार शेतकरी संख्या १,३८,०९९ तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ४१,०७९ एवढी आहे. 

पीक विमा काढलेले तालुकानिहाय शेतकरी तालुका                                   शेतकरी संख्या भंडारा                                           २३६९० मोहाडी                                          ३१६७८ तुमसर                                           १९८५४ पवनी                                             २५२४७ साकोली                                         २६७६० लाखनी                                          २७७४० लाखांदूर                                         २४५०९ एकूण                                        १,९७,१७८

या पिकांना विमा लागू खरीप हंगामात धान या पिकासाठी सर्व ४० महसूल मंडळे अधिसूचित आहेत. तसेच सोयाबीनसाठी भंडारा, मोहाडी, लाखांदूर व पवनी तालुक्यांतील २६ महसूल मंडळे अधिसूचित आहेत. धान व सोयाबीन पिकासाठी विमा लागू आहे. केंद्र शासनाने गेल्यावर्षीपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात विमा उतरण्याची सुविधा केली आहे. 

लाडकी बहीण' मुळे वाढली होती मुदत यंदा शासनाने पीक विमा काढण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत दिली होती; परंतु याच कालावधीत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. पीक विमा काढण्यास अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विमा काढण्याची मुदत शासनाने ३१ जुलैपर्यंत वाढवली होती.

शेतकऱ्यांत निराशेचे वातावरणदरवर्षी पीक विमा उतरवूनही नुकसान भरपाई मिळत नाही, अशी ओरड शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे यावर्षी पीक विमा उतरविण्यासाठी शेतकरी तयार होत नव्हते. मागील वर्षी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण दरवर्षी पाहावयास मिळते, हे विशेष. 

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेतीFarmerशेतकरी