शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील मुरूमाचे ढिगारे अपघातास आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST

तुमसर-गोंदिया राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. दोन वर्षापासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. माडगी शिवारात हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. पुलाजवळ मुरूमाची ढिगारे पडून आहे. वाहनांमुळे हा मुरूम रस्त्यावर येत आहे. ढिगाऱ्यातील मुरूम निट पसरविण्याचे सौजन्यही संबंधित कंत्राटदाराला दाखविता आले नाही.

ठळक मुद्देमाडगी शिवारातील प्रकार, सर्वत्र धुळीचे लोट, दृश्यमानता झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रस्ता सुरक्षीत असावा, असा नियम आहे. परंतु तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी (दे.) शिवारात रस्त्याजवळ मुरूमाचे ढिगारे पडून आहे. रस्त्यावर भरावाकरिता पाखण मातीचा वापर करण्यात आला आहे. पावसाळ्यात हा रस्ता निसरडा तर उर्वरितवेळी धुळीचे लोट वाहतात. या प्रकाराने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे.तुमसर-गोंदिया राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. दोन वर्षापासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. माडगी शिवारात हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. पुलाजवळ मुरूमाची ढिगारे पडून आहे. वाहनांमुळे हा मुरूम रस्त्यावर येत आहे. ढिगाऱ्यातील मुरूम निट पसरविण्याचे सौजन्यही संबंधित कंत्राटदाराला दाखविता आले नाही.काही ठिकाणी रस्ता भरावात पाखण मातीचा वापर करण्यात आला आहे. पाऊस पडल्यानंतर रस्ता निसरडा होता. तर इतर वेळी धुळीचे लोट उडतात. त्यामुळे दृश्यमानता कमी होते. समोरील वाहने दिसत नाही. अपघाताची शक्यता बळावली आहे. येथून जाताना वाहन धारकांना जीव मुठीत घेवून जावे लागते. राष्ट्रीय महामार्ग आहे की गल्लीतील रस्ता अशी म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर येते.जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी या रस्त्याच्या बांधकामाबाबत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, माडगी शिवारातून या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अपघाताला आमंत्रण देणारा हा रस्ता आहे. वारंवार तक्रारी करूनही याकडे प्राधीकरणाला लक्ष देण्याची सवड नाही. त्यामुळे आता आत्मी आंदोलनाच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. या रस्त्याची ही अवस्था गत काही दिवसांपासून असून माडगी परिसरातील नागरिकच नव्हे तर रस्त्यावरून जाणारे वाहन धारकही त्रस्त झाले आहे. दुचाकी चालकांना तर येथून वाट कशी काढावी, असा प्रश्न पडतो. परंतु कुणी याकडे लक्ष देत नाही.प्राधीकरणाचे दुर्लक्षराष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावर महामार्ग प्राधीकरणचे नियंत्रण आणि देखरेख आहे. परंतु त्यांचेही येथे दुर्लक्ष होत आहे. अपघाताची प्रतीक्षा तर महामार्ग प्राधीकरण करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गत वर्षभरापासून येथे संथगतीने काम सुरू आहे. लोकप्रतीनिधीही याकडे दुर्लक्ष करीत आहे. धुळीमुळे नागरिकांना डोळ्याचे आजार बळावले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकpollutionप्रदूषण