शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसह सासू, साळा आणि साळीवर चाकूने सपासप वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST

बुधवारी सकाळी काजल आपल्या एक वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी सानगडी येथे आली. पाठोपाठ दुपारी १ वाजता विकासही सानगडीत पोहोचला. सासऱ्याच्या घरी पत्नीसोबत वाद घालत पत्नीवर चाकूने हल्ला केला. हा वाद सोडविण्यासाठी आलेल्या सासू, अर्चना, साळा रोहित, साळी प्राची यांच्यावरही चाकूने हल्ला केला. पत्नी आणि सासूच्या डोक्यावर व गालावर गंभीर दुखापत झाली, तर साळीच्या डोक्यावर चाकू मारला. साळा रोहितच्या पोटात चाकू भोसकल्याने तो गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देसानगडीची घटना : साळ्याची प्रकृती गंभीर, आरोपी पती पसार

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : घरगुती वादात माहेरी आलेल्या पत्नीसह सासू, साळा आणि साळीवर चाकूने सपासप वार  केल्याची घटना साकोली तालुक्यातील सानगडी येथे बुधवारी दुपारी घडली. यात चौघे जखमी झाले असून, साळ्याच्या पोटावर चाकूने हल्ला केल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर आरोपी सानगडी येथून पसार झाला. विकास अशोक सोनवाणे (३२) रा. चान्ना कोळका जि. गोंदिया असे आरोपी पतीचे नाव आहे.  पत्नी काजल विकास सोनवाणे (२२) रा. चान्ना कोळका, सासू अर्चना महेंद्र मेश्राम (५२), साळा रोहित महेंद्र मेश्राम (१८), साळी प्राची महेंद्र मेश्राम (२०) तिघे रा. सानगडी अशी जखमींची नावे आहेत. गत काही महिन्यापासून विकास आणि काजल यांच्यात घरगुती कारणावरून वाद होता. चार महिन्यापूर्वीपासून ती माहेरीच होती. महिनाभरापूर्वी ती सासरी चन्ना कोळका येथे गेली. दरम्यान, मंगळवारी विकास आणि काजल यांच्यात पुन्हा वाद झाला. बुधवारी सकाळी काजल आपल्या एक वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी सानगडी येथे आली. पाठोपाठ दुपारी १ वाजता विकासही सानगडीत पोहोचला. सासऱ्याच्या घरी पत्नीसोबत वाद घालत पत्नीवर चाकूने हल्ला केला. हा वाद सोडविण्यासाठी आलेल्या सासू, अर्चना, साळा रोहित, साळी प्राची यांच्यावरही चाकूने हल्ला केला. पत्नी आणि सासूच्या डोक्यावर व गालावर गंभीर दुखापत झाली, तर साळीच्या डोक्यावर चाकू मारला. साळा रोहितच्या पोटात चाकू भोसकल्याने तो गंभीर जखमी झाला. चौघांवर चाकूहल्ला करून विकास तेथून पसार झाला. चौघांनाही साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रोहितची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी भंडारा येथे रवाना करण्यात आले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.या घटनेची माहिती होताच साकोलीचे ठाणेदार दीपेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक डी. आर. कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक बागडे घटनास्थळी दाखल झाले.

आरोपी आहे खाजगी शाळेत शिक्षक - चाकू हल्ला करणारा आरोपी विकास सोनवाणे हा एका खाजगी शाळेत कॉन्व्हेंट शिक्षक आहे. कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे त्याच्यापुढे कुटुंबांचा गाढा चालविण्याचा प्रश्न निर्माण झाला. यातून वाद होत असल्याची माहिती आहे. गत वर्षभरापासून पत्नीसोबत त्याचा वाद सुरू होता. चार महिन्यापुर्वी पत्नी माहेरी आली होती. तीन महिने माहेरी राहून पुन्हा ती सासरी गेली आणि वाद झाला.

 

टॅग्स :Teacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी