शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

खाद्य पदार्थातील भेसळ आरोग्यासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:27 IST

ठोक व्यापाऱ्यांकडून तर चिल्लर विके्रत्यांपर्यंत अगदी भेसळयुक्त खाद्य पदार्थ भेसळ होत असल्याने अनेकांना अंगावर पूरळ येणे तर काहींना अंगावर खाज सुटल्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सणासुदीच्या दिवसांत तेलात पामोलीयन तेलाची भेसळ होत असल्याने थंडी पडताच तल गोठायला सुरुवात होते. भेसळीचा प्रकार उघडकीस येत आहे.

ठळक मुद्देअन्न पुरवठा विभागाची डोळेझाक, तेलातून होतेय भेसळ

भंडारा : सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्य सामग्री व तेलाची विक्री होते. या दिवसांत भेसळीला उधाण येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसून अन्न भेसळ विभागाचे अधिकारीसुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे गोरगरीबांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उपाहारगृहात स्वच्छतेचा अभाव दिसून येत असला तरी याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे.ठोक व्यापाऱ्यांकडून तर चिल्लर विके्रत्यांपर्यंत अगदी भेसळयुक्त खाद्य पदार्थ भेसळ होत असल्याने अनेकांना अंगावर पूरळ येणे तर काहींना अंगावर खाज सुटल्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सणासुदीच्या दिवसांत तेलात पामोलीयन तेलाची भेसळ होत असल्याने थंडी पडताच तल गोठायला सुरुवात होते. भेसळीचा प्रकार उघडकीस येत आहे. काहींनी आता गोठणारे पामोलीयन तेल तूर्तास भेसळ करणे थांबविल्याचे सुध्दा सांगितले जाते.तांदूळ, साखर, डाळ, रवा, बेसन, पीठ, एवढेच नव्हेतर गव्हामध्येसुध्दा सर्रास भेसळ सुरू आहे. रेशनचा गहू खुल्या बाजारात विक्रीकरिता दिसायला लागला आहे. भेसळ करणारे कोट्यधीश झाले तर गोरगरीबांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मात्र अन्न , भेसळ विभागाचे अधिकारीच मूग गिळून बसले आहे. एखाद्या दुकानात धाड टाकलीच तर शुध्द आणि नामांकित कंपनीच्या पुड्यातील तेल किंवा अन्नपदार्थ नमुनादाखल घेऊन प्रयोग शाळेकडे पाठविले जात आहे. यामळे हे नमुने कधी बदलले याबाबत ग्राहकांच्या लक्षात येतच नाही.केवळ खिसेभरू धोरण असल्याने गोरगरीबांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे गरिबांच्या पैशातून वेतन घेणाºया निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना कोण आवळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना या अन्नभेसळीमुळे आजाराला आमंत्रण द्यावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन संबधित विभागाने धडक मोहिम राबविण्याची मागणी आहे.उपहारगृहात नियमांना तिलांजलीशहरासह जिल्ह्यातील उपहारगृहामध्ये हजारो ग्राहक नास्ता, जेवण घेतात. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. कामावरील मानसांचे आरोग्य तपासणी केल्या जात नाही. तर नियमांना तिलांजली देऊन उपाहारगृहाचे सर्रास व्यवसाय सुरु आहे. असे असतानाही प्रशासन मात्र दुर्लक्ष करुन वेळ मारुन नेत असल्याचा प्रकार सुरु आहे, असा सूर अनेकांनी व्यक्त केला.

टॅग्स :foodअन्न