शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा कहर, हलका धान धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 22:29 IST

भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला यंदा समाधानकारक पाऊस कोसळला. या पावसाने धान पीक चांगले बहरून आले. सतत कोसळत असलेल्या पावसाने किडींचे प्रमाणही घटले. ओलितासाठी शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळही आली नाही. यंदा धानाचे अपेक्षेपेक्षा अधिक पीक होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, निसर्गाने पुन्हा यावर पाणी फेरले. गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कधी नव्हे, ते यंदा धानाचे बंपर पीक हाती येण्याची अपेक्षा असताना पाऊस त्यावर पाणी फेरत आहे. गत आठवडाभरापासून जिल्ह्यात पाऊस कोसळत असून, सोमवारपासून तर सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेला हलका धान धोक्यात आला आहे. हाताशी आलेला घास निसर्ग हिरावून तर नेणार नाही ना, अशी धास्ती शेतकऱ्यांना आहे.भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला यंदा समाधानकारक पाऊस कोसळला. या पावसाने धान पीक चांगले बहरून आले. सतत कोसळत असलेल्या पावसाने किडींचे प्रमाणही घटले. ओलितासाठी शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळही आली नाही. यंदा धानाचे अपेक्षेपेक्षा अधिक पीक होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, निसर्गाने पुन्हा यावर पाणी फेरले. गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे. सोमवारपासून तर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे. गत २४ तासांत जिल्ह्यात १६.६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात भंडारा १९.२ मिमी, मोहाडी २०.२ मिमी, तुमसर ३६.२ मिमी, पवनी २.६ मिमी, साकोली ३.२ मिमी, लाखांदूर १४.४ मिमी आणि लाखनी तालुक्यात २०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ११७ टक्के पाऊस कोसळला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ११६४.७ मिमी असून, आतापर्यंत जिल्ह्यात १५९१.४ मिमी पाऊस कोसळला आहे.तीन दिवस येलो अलर्टहवामान खात्याने भंडारा जिल्ह्यासाठी ११ ते १३ ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. मंगळवारी सकाळी ७.३० वाजतापासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला. दुपारी ३ वाजेपर्यंत पाऊस कोसळत होता. जिल्ह्यातील साकोली, तुमसर, भंडारा, मोहाडी, पवनी, लाखांदूर आणि लाखनी तालुक्यात हा पाऊस कोसळला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

बावनथडीचे चार तर गोसेचे दोन गेट उघडले

- जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत असल्याने, प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. सध्या गोसेखुर्द प्रकल्पात ७१.६८ टक्के जलसाठा असून, या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. बावनथडी प्रकल्प १०० टक्के भरला असून, मंगळवारी चार दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले आहे. यासोबतच संजय सरोवरमध्ये ९६.१४ मिमी, पुजारीटोला प्रकल्पात ९३.४३ मिमी जलसाठा आहे.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी