शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

कधी बेल फळाचा रस प्यायले का? जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 14:36 IST

Bhandara : रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास करते मदत

अतुल खोब्रागडेभंडारा : उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही करणाऱ्या गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या थंड पेयांचं सेवन करतात. यातील एक सर्वात फायद्याचा रस म्हणजे बेल फळाचा रस. बेलाच्या रसाचे उन्हाळ्यात अनेक फायदे होतात. बेलाचा वापर आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच तुमचं सौंदर्य चांगलं ठेवण्यासाठीही होऊ शकतो. आयुर्वेदातही बेलाचे गुण सांगण्यात आले आहेत. 

बेल फळाचा रस तुमच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. उन्हाळ्यात दररोज बेल फळाचा रस घेतल्यास याचा फायदा काही दिवसांतच बघायला मिळेल. बेल फळात प्रोटीन, थायमीन, रायबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन-सीसारखे आणखीही काही पोषक तत्वे आढळतात. बेलफळ हे एक आरोग्यवर्धक फळ आहे, जे पचन सुधारण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि विविध आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास मदत करते.

भोलेनाथाचे प्रिय बेलपत्रहिंदू धर्मात बेलपत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक कार्यात बेलपत्र वापरले जाते. भगवान शिवजीला प्रसन्न करण्यासाठी माता पार्वतीने याच बेलपत्राचा उपयोग केला होता.

बेलफळाचे आरोग्यदायी फायदे

  • बेलफळात फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात आणि आतड्याची कार्यक्षमता वाढवतात.
  • बेलफळात जीवनसत्वे अ, ब आणि क असतात, जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहेत.
  • बेलच्या साली आणि फांद्यांमध्ये असलेला फेरोनिया गम नावाचा घटक मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.
  • रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
  • बेल त्वचेवरील डाग, सुरकुत्या आणि अन्य समस्या कमी करण्यास मदत करते. तसेच केशगळणे कमी करते.
टॅग्स :bhandara-acभंडाराHealth Tipsहेल्थ टिप्स