शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी उपाशीपोटी चहा, कॉफी पिण्याची सवय आहे? तज्ज्ञ म्हणतात, पचनक्रियेत अडथळा व पोटात निर्माण होतो गॅस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  भंडारा : जिल्ह्यात अनेकांना सकाळी उठल्यावर उपाशीपोटी चहा, कॉफी पिण्याची सवय आहे. सकाळी उठले की, चहा, ...

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात अनेकांना सकाळी उठल्यावर उपाशीपोटी चहा, कॉफी पिण्याची सवय आहे. सकाळी उठले की, चहा, कॉफीचा कप हातात पडतो. लहान मुलेही मोठ्यांचे बघून सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा घेतात. मात्र, या चहा-कॉफीचे दुष्परिणाम आहेत. उपाशीपोटी चहा घेतल्यानंतर पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊन पोटात गॅस तयार होतो. चहा, कॉफी पिल्याने अनेकांना ताजेपणा अनुभवास येतो. मात्र, त्यामुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञ म्हणतात, सकाळी उपाशीपोटी चहा, कॉफी पिणे हानिकारक आहे.

प्रमाण किती असावे? 

  • दुधात चहा किंवा कॉफी टाकण्याचे प्रमाण कमीच असले पाहिजे. या तुलनेत साखरेचे प्रमाण त्या तुलनेत चालू शकते. 
  • एकावेळी एक कप चहा किंवा कॉफी पुरेशी ठरते; परंतु अनेकजण जास्त चहा पितात. उपाशीपोटी चहा-कॉफी घेणे आरोग्यास अतिशय हानिकारक आहे. यामुळे भूक न लागणे व अपचन यांसारखे त्रास उद्भवतात.

सकाळी दूध, फळे सर्वोत्तम डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उपाशीपोटी चहा व कॉफी घेऊ नये, यापेक्षा दूध व फळे घेतल्यास उत्तम होईल. चहा किंवा कॉफी घेणे शक्यतो टाळावे. हे शक्य नसेल तर हे पेय नाश्त्यानंतर घ्यावेत.

चहा व कॉफीचे दुष्परिणाम काय? चहा आणि कॉफी या दोन्हींचे दूरदर्शी विपरीत परिणाम असतात. वारंवार उपाशीपोटी चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर पचनक्रिया मंदावते. तसेच भूक लागण्याचे प्रमाण कमी होत राहते. अनेक लोक भूक टाळण्यासाठी चहा पितात. मात्र, यामुळे भूक व आहार आणखी कमी होतो.  सकाळी उपाशीपोटी चहा घेतल्यानंतर पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊन पोटात गॅस तयार होतो.

"सकाळी उपाशीपोटी चहा व कॉफी न घेता नाश्ता घेतला पाहिजे. त्यानंतर चहा किंवा कॉफी प्यावी. उपाशीपोटी चहा पिणे पूर्वापार सुरू आहे. मात्र, तरुण आणि विशेष करून बालकांनी या पेयापासून दूर राहिले पाहिजे. फक्त सवय म्हणून हे पेय पिणे धोक्याचे आहे. एकवेळ चहा, कॉफी घेणे चालू शकते. मात्र, उपाशीपोटी चहा-कॉफी घेणे आरोग्यास अतिशय हानिकारक आहे. शक्यतो चहा व कॉफी पिणे प्रत्येकाने टाळलेलेच बरे असते. नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात." - डॉ. सौरभ रोकडे, पोटविकारतज्ज्ञ, भंडारा 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सbhandara-acभंडारा