शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

हरित सेनेतून होणार राज्यातील वृक्षांचे संगोपन

By admin | Updated: February 8, 2017 01:32 IST

राज्य शासन व वन विभागाने ५० कोटी वृक्षारोपण व संगोपनाचा कार्यक्रम लोक सहभागातून राबविण्याचा संकल्प केला आहे.

वन विभागाचा पुढाकार : ३१ मार्चपर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करा भंडारा : राज्य शासन व वन विभागाने ५० कोटी वृक्षारोपण व संगोपनाचा कार्यक्रम लोक सहभागातून राबविण्याचा संकल्प केला आहे. यासाठी महाराष्ट्र हरित सेना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य होण्यासाठी नागरिकांनी संकेत स्थळावर ३१ मार्चपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना केले आहे. राज्यामध्ये १ जुलै २०१६ रोजी जनतेच्या सहभागाने एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट सहज ओलांडले गेले. प्रत्यक्षात एकाच दिवशी २.८३ कोटी वृक्ष लागवड झाली. ‘लिमका बुक आॅफ रेकॉर्ड’ या संस्थेने या आगळया वेगळया आणि नाविन्य कार्यक्रमाची दखल घेतली आहे. जागतिक तापमानातील वाढ अणि ऋतु बदल या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील वनक्षेत्र २० टक्के वरुन ३३ टक्के पर्यंत नेण्याचा भाग म्हणून, वृक्षारोपणाची गती तुटू न देता त्यामध्ये सातत्य ठेवावे, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्याबाबत कृती कार्यक्रम आखून अंमलबजावणी करण्याबाबतच्या आवश्यक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शासनाच्या सर्व विभागांचा समावेश आहे. नियोजित ५० कोटी वृक्षारोपणाचा व संगोपनाचा कार्यक्रम लोकसहभागाद्वारे जन चळवळीत रुपांतरीत करुन यशस्वीरित्या राबविण्यासाठी मोठया प्रमाणात लोकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. यासाठी ‘महाराष्ट्र हरित सेना’ स्थापित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य म्हणून नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर ३१ मार्च २०१७ पर्यंत किमान १ कोटी लोकांनी स्वयंस्फुर्तीने स्वयंसेवक म्हणून उपक्रमाचे सदस्य म्हणून नोंदणी करावी, असे अपेक्षित आहे. ग्रीन आर्मीचे सदस्य असलेल्या सभासदांना वृक्ष लागवड, संगोपन, वन व वन्यजीव आणि वन विभागातील संबंधित क्षेत्रामध्ये आपले योगदान देता येईल. तसेच या उपक्रमात उत्तम काम करणाऱ्या सभासदांना बक्षिस योजना व इतर सवलतीद्वारे सन्मानित करण्याची योजना विचाराधीन आहे. नोंदणीची पध्दत अत्यंत सोपी असून संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरल्यानंतर सभासद नोंदणी झाल्याचे आणि त्यानुसार प्रमाणपत्र सिस्टिममध्ये तयार होवून सदस्याच्या मेल आयडीवर आणि एसएमएसवर पाठविले जाईल. जिल्हयातील विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी, त्यांचे कुटूंबीय, आप्तेष्ठ, मित्र परिवार, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात काम करणा-या अशासकीय आणि खाजगी संस्था यांनी महाराष्ट्र हरित सेनेमध्ये सदस्य नोंदणी केल्यास त्यांना अशा उपक्रमात काम करण्याची संधी मिळेल. भंडारा जिल्हयातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, शाळा, विद्यार्थी व वनप्रेमींनी जास्तीत जास्त नोंदणी करुन जिल्हा व महाराष्ट्र हरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)