शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

जलयुक्त शिवारने भूजल पातळीत अर्धा मीटर वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:29 IST

राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने भंडारा जिल्ह्यात जलक्रांती घडवून आणली. चार वर्षात सरासरीपेक्षा २८ टक्के पाऊस कमी होऊनही भूजलपातळीत मात्र अर्धा मीटरने वाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी होणार आहे.

ठळक मुद्दे१८७ गावे जलपूर्ण : २०१ गावात चार हजार ३५६ कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने भंडारा जिल्ह्यात जलक्रांती घडवून आणली. चार वर्षात सरासरीपेक्षा २८ टक्के पाऊस कमी होऊनही भूजलपातळीत मात्र अर्धा मीटरने वाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी होणार आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १२८०.०३ मी.मी. आहे. जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत १०२५ मी.मी. पाऊस झाला. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत २५४.३३ मीमी म्हणजे १९८७ टक्के घट झाली. गत चार वर्षात साधारणत: २८ टक्के घट नोंदविण्यात आली. मात्र त्यानंतरही जिल्ह्याच्या भुजलपातळीत वाढ झाल्याचे दिसून येते. भुजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्याची २५ पानलोट क्षेत्रात विभागणी केली आहे. पाणलोट क्षेत्रातील उताºयानुसार प्रत्येक पाणलोट क्षेत्र तीन भागात रन आॅफ झोन रिजार्ज, स्टोरेज झोनमध्ये विभागणी करण्यात आली. अशा प्रत्येक झोनमध्ये ७४ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या. सदर निरीक्षण विहिरींची सप्टेंबर २०१८ मध्ये नोंद घेण्यात आली. या नोंदीवरून भुजल पातळीत ०.४० मीटर वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पाच वर्षाची भुजल सरासरी पातळी २.५२ मीटर आहे. सप्टेंबर महिन्यात २.४७ मीटर पातळी असून यात ०.५० मीटर पाणी पातळी वाढली आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी या तालुक्यात सरासरी शून्य ते एक मीटर भुजल पातळी वाढलेली आहे.ही किमया केवळ जलयुक्त शिवार योजनेमुळे साधता आला. २०१४ मध्ये भंडारा जिल्ह्याची भुजलपातळी २.८७ मीटर होती. आता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सप्टेंबरमध्ये भुजल पातळी २.४७ मीटर झाली आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, पवनी, लाखांदूर या तालुक्यात सरासरी ०.५० मीटर पातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेने तालुक्यात जलक्रांती केली असून दुष्काळावर मात करण्यास मदत होणार आहे.८१ हजार टीसीएम पाणीसाठाभंडारा जिल्ह्यात चार वर्षात २०१ गावामध्ये जलयुक्त शिवारांची चार हजार ३५४ कामे पूर्ण झाली. या कामांमुळे ८१ हजार ५३९ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. यातून ३८ हजार ३३२ हेक्टर संरक्षीत सिंचन निर्माण झाले आहे. तर चार वर्षात १८७ गावे जलपरिपूर्ण झाली आहे. जलयुक्त शिवारमुळे शेतकºयांना वेळेवर पाणी उपलब्ध होत आहे.