शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
11
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
12
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
13
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
14
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
15
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
16
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
17
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
18
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
19
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
20
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू

ज्ञानरचनावाद ही सांघिक जबाबदारी

By admin | Updated: February 29, 2016 00:24 IST

शिक्षकांनी सृजनशिलतेचा वापर करून स्वयंप्रेरणा व जिज्ञासावृत्ती जागृत करावी. ज्ञानरचना वाद ही सांघीक जबाबदारी आहे.

जाख शाळेत उपक्रम : ४४ शिक्षकांचा सहभाग, गटशिक्षणाधिकारी तिडके यांचे प्रतिपादनभंडारा : शिक्षकांनी सृजनशिलतेचा वापर करून स्वयंप्रेरणा व जिज्ञासावृत्ती जागृत करावी. ज्ञानरचना वाद ही सांघीक जबाबदारी आहे. तसेच ज्ञानरचना वाद प्रक्रियेला बळकट करण्यासाठी लोकसहभाग वाढवावा, असे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी एस.एच. तिडके यांनी केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत भंडारा तालुक्यातील जाख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय कार्यप्रेरणा व शैक्षणिक साहित्य निर्मिती चर्चासत्र या विषयावर कृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य मंजुषा जगनाडे या होत्या. उद्घाटन भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.एच. तिडके यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून केंद्र प्रमुख पी.जी. भोयर, दवडीपार येथील केंद्रप्रमुख जी.एस. भोयर, पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर सादतकर, दिलीप बडवाईक उपस्थित होते. मार्गदर्शक ज्ञानेश्वर सादतकर, दिलीप बडवाईक यांनी शैक्षणिक साहित्यातून मुलांना अध्ययनकृती समजून घेण्यास सहज सोपे होते व त्यातून मिळणारे ज्ञान कायमस्वरुपी स्मरणात राहते. तसेच बालके स्वयंप्रेरित होऊन आनंदाने अध्ययन प्रक्रियेत सहभागी होतात असे मत व्यक्त केले. मंजुषा जगनाडे म्हणाल्या, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षकांनी चांगले शिकवून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानरचना वादासारखे उपक्रम राबवावे. इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकणाऱ्या मुलांपेक्षा ग्रामीण भागातील मुलांना प्रगत होण्यासाठी नवनवीन साहित्यातून व तंत्रज्ञानातून माहिती देऊन प्रगत करावे. केंद्रप्रमुख भोयर यांनी ज्ञानरचनावाद प्रक्रिया शैक्षणिक साहित्याशिवाय अपुर्ण आहे. त्यासाठी शैक्षणिक साहित्यांची गरज आहे. असे मत व्यक्त केले. संचालन मुख्याध्यापक रमेश सिंगनजुडे यांनी तर आभार रविशंकर बिसने यांनी मानले. चर्चासत्रासाठी नंदा शहारे यांनी सहकार्य केले. यावेळी केंद्रातील उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदविधर शिक्षक व सहाय्यक शिक्षक असे एकुण ४४ शिक्षकांनी सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)