शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

जिल्ह्यात गुटखा बंदी कायदा नावालाच, खुलेआम होतेय विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 12:41 IST

पानटपऱ्यांवरून अवैध विक्री : प्रशासन धडक मोहीम राबविणार का?

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात तंबाखू, गुटखा विक्री बंदीचा कायदा नावालाच दिसून येत आहे. शहरांसोबत गावागावांत खुलेआम पानटपऱ्यांवर तंबाखू व गुटख्याची विक्री होत आहे. एवढेच नव्हे तर शाळा परिसरालगत ही दुकाने खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे प्रशासन धडक मोहीम राबविणार काय, असा प्रश्न आहे.

राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा बंदीचा निर्णय झाला. त्याला बारा वर्षे पूर्ण झाली; पण ना त्याची कडक अंमलबजावणी झाली, ना गुटखा विक्री थांबली. शहर किंवा ग्रामीणमधील पानटपरी, दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होत आहे. गुटखा विक्री होत असतानाही कारवाई होताना दिसत नाही. आंतरराज्यीय सीमांवर पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा, या प्रश्नाचे ठाम उत्तर अधिकारी देऊ शकत नाहीत.

शहरामध्ये इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीला येतो. गुटखा बंदीनंतर अनेकांनी मावा विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला. त्यातूनच गुटख्याची विक्री सुरुवातीला चोरून केली जात होती. आता सर्रासपणे केली जात आहे. तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून निरोगी, सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी हातभट्टी दारू, गुटखा, मावा विक्रीवर कडक निर्बंध लावण्यात आले; पण शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे कायद्याचे पालन होत नाही. जिल्ह्यात शहरच नव्हे, तर ग्रामीण परिसरात गुटखा विक्री सर्रासपणे पानटपरी, दुकानांमध्ये होते. गुटखा विक्रीसाठी व्यापाऱ्यांची मोठी साखळी कार्यरत आहे. ही साखळी तोडल्यानंतरच गुटखा विक्री कमी होण्यास मदत होणार आहे. कारवाईची धडक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.

शरीरावर परिणाम, मात्र नाद सुटता सुटेना तंबाखू, गुटख्याचे परिणाम अनेकांच्या आरोग्यावर झाले आहेत. गुटखा खाणाऱ्यांचे तोंड उघडत नाही. अनेकांना व्यवस्थित जेवणही करता येत नाही. आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. तरुणांच्या आरोग्यावर तंबाखू, गुटख्याचे सर्वाधिक वाईट परिणाम दिसत असल्याचे कर्करोगतज्ज्ञ सांगतात. तरीपण, गुटखा, मावा खाणाऱ्यांना त्याचा नाद सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे.

अवैध साखळी तोडण्याची गरज जिल्ह्यात मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांतून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची आयात होते. अन्न व औषध प्रशासन, तसेच पोलिस विभागाकडून कित्येकदा कारवाया केल्या जातात. मात्र, त्यानंतरही त्यांची आवक व विक्री बंद होताना दिसत नाही. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची आयात व विक्री यांची मोठी साखळी असून, ती तोडण्यासाठी कठोर कारवायांची गरज आहे.

"व्यसन हा एकप्रकारचा मानसिक आजार आहे. तंबाखू, गुटखा खाण्याची तलब सुटता सुटत नाही. परंतु, प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळते. तंबाखूचे व्यसन कर्करोगाला आमंत्रण देणारे आहे. कर्करोगाचा शेवट जीव गमावल्यानंतर होतो. त्यामुळे तरुणांनी व कुटुंबीयांनी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या पाकिटावर त्याच्या दुष्परिणामांची माहिती छायाचित्राद्वारे दिली जाते."- डॉ. रत्नाकर बांडेबुचे, मनोविकार तज्ज्ञ, भंडारा.

टॅग्स :bhandara-acभंडाराTobacco Banतंबाखू बंदी