लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घेराव घालण्यासाठी आलेल्या माजी खासदार नाना पटोले यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चक्क जमिनीवर बसून चर्चा केली. यावेळी काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण जिल्हा परिषदेच्या आवारात निर्माण झाले होते.जिल्ह्यतील शेतकऱ्यांचा संपूर्ण धान खरेदी करावा, शेतकऱ्यांना सोळा तास वीज उपलब्ध करुन द्यावी या मागणीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शेतकरी शेतमजूर आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित असलेल्या जिल्हा परिषद सभागृहाबाहेर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. जिल्हा परिषदेला छावणीचे रुप आले होते. दरम्यान गनिमीकाव्याने नाना पटोले यांनी सभागृहात प्रवेश केला. त्यावेळी बैठक सुरु असल्याने त्यांनी सभागृहाबाहेर येऊन ठिय्या दिला. दरम्यान नियोजन समितीची बैठक आटोपताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सभागृहाबाहेर आले आणि चक्क जमिनीवर बसून नाना पटोले यांच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरु केली.यावेळी कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी निवेदन स्विकारुन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.भिंतीवरुन उडी घेऊन केला जिल्हा परिषदेत प्रवेशमाजी खासदार नाना पटोले यांनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपुढे पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. कमांडोसह शेकडो पोलीस याठिकाणी तैनात करण्यात आले होते. कोणताही आंदोलनकर्ता आतमध्ये शिरणार नाही याची दक्षता घेतली जात होती. मात्र ४ वाजताच्या सुमारास नाना पटोले गनिमीकाव्याने जिल्हा परिषदेत दाखल झाले. जिल्हा परिषद इमारतीच्या मागच्या बाजुच्या भिंतीवरुन चक्क उडी मारुन नाना पटोले जिल्हा परिषदेच्या आवारात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या उजवा पायाला चांगलीच दुखापत झाली. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत नाना पटोलेंचे आगमन झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. काही कार्यकर्त्यांसोबत पोलिसांची बाचाबाची झाली. त्यानंतर नाना पटोले यांनी सभागृहापुढे ठिय्या दिला आणि पालकमंत्र्यानी येवून चर्चा केला.
पालकमंत्र्यांनी केली जमिनीवर बसून आंदोलनकर्त्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:48 IST
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घेराव घालण्यासाठी आलेल्या माजी खासदार नाना पटोले यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ...
पालकमंत्र्यांनी केली जमिनीवर बसून आंदोलनकर्त्यांशी चर्चा
ठळक मुद्देशेतकऱ्यांचे प्रश्न : नाना पटोलेंनी घातला पालकमंत्र्यांना घेराव