शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नेरला उपसा सिंचन योजनेची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:28 IST

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजनेला आज पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भेट देवून पाहणी केली. नेरला उपसा सिंचन योजनेचे पंपगृह ,वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर नेरला गावाजवळ बांधण्यात आले आहे. पंपगृहामध्ये प्रत्येकी १०१५ अश्वशक्तीचे १२ व्हर्टीकल टरबाईन पंप बसविण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांशी चर्चा : समस्या सोडविण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजनेला आज पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भेट देवून पाहणी केली. नेरला उपसा सिंचन योजनेचे पंपगृह ,वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर नेरला गावाजवळ बांधण्यात आले आहे. पंपगृहामध्ये प्रत्येकी १०१५ अश्वशक्तीचे १२ व्हर्टीकल टरबाईन पंप बसविण्यात आले आहे. या योजनेला पालकमंत्र्यांनी भेट देवून पाहणी केली. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.अधीक्षक अभियंता जगत टाले, कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फाळके, सहाय्यक अभियंता अमोल वैद्य, उपविभागीय अभियंता अजय वैद्य, अजय कावळे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. उर्ध्व नलिकेच्या चार रांगा २५०० मि.मी. व्यासाच्या १६ मि.मी जाडीच्या ०.६९० कि.मी. लांबीच्या आहेत. याद्वारे ३७ घ.मी./से.चा. विसर्ग वितरण कुंडात सोडण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेद्वारे भंडारा जिल्हयाच्या चार तालुक्यातील ११६ गावातील २१ हजार ७२७ हेक्टर लाभ क्षेत्राच्या माध्यमातून २८,६८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याकरीता एकूण पाणी वापर १४३.७७ दलघमी इतका आहे, अशी माहिती योजनेचे अभियंता अमोल वैद्य यांनी दिली.नेरला उपसा सिंचन योजनेमध्ये शेत व घर गेलेल्या नागरिकांनी पुर्नवसनाच्या मागणीसाठी आज पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांची भेट घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावर बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, पुर्नवसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. पुर्नवसन गावात विविध सुविधा मिळण्यासाठी नागरिकांनी पालकमंत्र्यांना विनंती केली. याबाबत संबंधित विभागाला तातडिने सुविधा पुरविण्यासाठी निर्देश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. घराच्या मोबदला मिळणेबाबत ही यावेळी निवेदन सादर करण्यात आले. हा प्रश्न बैठकीत निकाली काढू असे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पParinay Fukeपरिणय फुके