आॅनलाईन लोकमतभंडारा : भीमशक्ती संघटनेच्या निष्ठावान, प्रामाणिक, विश्वासू कार्यकर्त्यांनी भीमशक्ती संघटनेची कार्यप्रणाली व विचारसरणी घराघरापर्यंत पोहचून भीमशक्ती संघटनेची चळवळ गतीमान करण्याचा कृतीसंकल्प करावा, असे आवाहन भीमशक्ती संघटनेचे विदर्भ प्रांतीय अध्यक्ष अॅड.यशवंत मेश्राम यांनी केले.फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी, जीजाऊ, सावित्रीबाई फुले, बिरसामुंडा या थोर महामानवांच्या स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय, मैत्री, प्रज्ञा, शिल, करुणा, अहिंसा या समताधिष्ठीत विचारसरणीवर आधारित भीमशक्ती संघटना संस्थापक अध्यक्ष तथा माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या संकल्पनेतून साकार झालीआहे.भंडारा तालुक्यातील रावणवाडी येथे आयोजित केलेल्या भीमशक्ती संघटना भंडारा जिल्हा पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्ता विचार प्रबोधन कार्यक्रम प्रसंगी थोर महामानवांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण व दिप प्रज्वलीत करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी भीमशक्ती संघटनेचे विदर्भ प्रांतीय अध्यक्ष अॅड.यशवंत मेश्राम, भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे, महासचिव हर्षवर्धन हुमणे, कार्याध्यक्ष दामोधर सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष महेश कोचे, मंगेश मेश्राम, बंडू बोरकर, राजेश देशभ्रतार, बाळकृष्ण शेंडे, डी.एस. भैसारे, खेमचंद अभिये, पतीराम चव्हाण, दामोधर उके, भाऊदास मेश्राम, अमीत बडोले, मोरेश्वर लेंढारे उपस्थित होते. यावेळी कार्याध्यक्ष दामोधर सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून भंडारा जिल्ह्यातील सक्रीय पदाधिकारी व कार्यकर्ते भीमशक्ती संघटनेची विचारसरणी घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी नि:स्वार्थपणे जीवाचे रान करतील अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली. भीमशक्ती संघटना ही अन्याय, अत्याचाराविरोधात लढणारी सर्व समावेशक अशी सामाजिक संघटना, न्याय मिळवून देण्यास सर्वतोपरी तयार असल्याने युवकांनी भीमशक्ती संघटनेत सामील होण्याचे अवाहन महासचिव हर्षवर्धन हुमने यांनी केले. भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भीमशक्ती संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन परामार्थशील कार्य करावे असे आवाहन कार्याध्यक्ष दामोधर सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संघटनमंत्री बाळकृष्ण शेंडे यांनी केले.
भीमशक्ती संघटनेची चळवळ गतीमान करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:11 IST
भीमशक्ती संघटनेच्या निष्ठावान, प्रामाणिक, विश्वासू कार्यकर्त्यांनी भीमशक्ती संघटनेची कार्यप्रणाली व विचारसरणी घराघरापर्यंत पोहचून भीमशक्ती संघटनेची चळवळ गतीमान करण्याचा कृतीसंकल्प करावा, असे आवाहन भीमशक्ती संघटनेचे विदर्भ प्रांतीय अध्यक्ष अॅड.यशवंत मेश्राम यांनी केले.
भीमशक्ती संघटनेची चळवळ गतीमान करा
ठळक मुद्देयशवंत मेश्राम यांचे आवाहन: रावणवाडी येथे कार्यकर्ता विचार प्रबोधन कार्यक्रम