शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाचा हटके अंदाज; स्वत: ट्रॅक्टर चालवत नवरीला घेऊन आला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 11:14 IST

भूमिपुत्राने आपली वरात चक्क ट्रॅक्टरमधून काढली. एवढेच नाही तर सजविलेला ट्रॅक्टर स्वत: चालवित नवरीला गावात घेऊन आला. शेतकरी पुत्राच्या या अनोख्या वरातीचे आता तालुक्यात कौतुक होत आहे.

ठळक मुद्देसाकोली तालुक्यातील वरातीची चौफेर चर्चा

संजय साठवणे

साकोली (भंडारा) : आधुनिक काळात लग्न सोहळा म्हणजे एक प्रकारे श्रीमंतीचे प्रदर्शन ठरत आहे. कुणी कारमधून, कुणी बैलगाडीतून तर कुणी हेलिकॉप्टरमधून वरात काढतात; मात्र साकोली तालुक्यातील परसोडीच्या भूमिपुत्राने आपली वरात चक्क ट्रॅक्टरमधून काढली. एवढेच नाही तर सजविलेला ट्रॅक्टर स्वत: चालवित नवरीला गावात घेऊन आला. शेतकरी पुत्राच्या या अनोख्या वरातीचे आता तालुक्यात कौतुक होत आहे.

साकोली तालुक्यातील परसोडी येथील नागेंद्र तेजराम भाजीपाले याचा विवाह गोंदिया जिल्ह्यातील घाटबोरी येथील जयशीला झिंगरे हिच्यासोबत सोमवारी झाला. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या नागेंद्रने आपली वरात ट्रॅक्टरवरून काढण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी ट्रॅक्टर सजवून वरात घाटबोरी येथे पोहोचली. तेथे रितीरिवाजाप्रमाणे लग्नसोहळा पार पडला.

सायंकाळी घाटबोरीवासीयांनी नवरीला निरोप दिला. पाहुणे मंडळी गावाकडे निघायच्या तयारीत होते. तेवढ्यात नवरदेव नागेंद्रने ट्रॅक्टरचा ताबा घेत चालकाच्या सीटवर जाऊन बसला. पाठोपाठ नवरीही बाजूच्या सीटवर बसली. नवरदेव नागेंद्रने ट्रॅक्टर चालवित नवरीला घेऊन आपले परसोडी गाव गाठले. नवरदेव ट्रॅक्टर चालवित असल्याचे दृश्य पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले. आता या लग्नाची संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे.

टॅग्स :Socialसामाजिकmarriageलग्न