शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
4
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
5
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
6
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
7
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
8
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
9
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
10
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
11
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
12
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
13
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
14
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
15
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
16
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
17
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
18
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
19
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
20
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज

बसमधील ३९ प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या चालकाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST

तुमसर येथून नागपूरकडे प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस वरठी येथील रेल्वे ओव्हरब्रिजजवळील ४० फुट खोल खाईत उतरली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. बस थेट उतारावरुन खाईकडे निघाली असतांना चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबविली. सर्व ३९ प्रवाशांचे प्राण वाचले. क्षणाचीही नजरचूक झाली असती तर अपघातात होणाऱ्या नुकसानीची कल्पनाही करवत नाही.

ठळक मुद्देवरठीकरांचा पुढाकार : चालक संदेश वाहानेच्या प्रसंगावधानाचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : तब्बल चाळीस फुट खोल खाईत बस उतरुनही चालकाच्या प्रसंगावधानाने एकाही प्रवाशाला साधे खरचटले नाही. ३९ प्रवाशांसाठी देवदूत ठरलेला बस चालक संदेश वाहाने यांचा वरठीकरांनी पुढाकार घेवून सत्कार केला. या अपघाताची आणि चालकाच्या समयसुचकतेची दिवसभर वरठीतच नव्हे संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होती.तुमसर येथून नागपूरकडे प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस वरठी येथील रेल्वे ओव्हरब्रिजजवळील ४० फुट खोल खाईत उतरली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. बस थेट उतारावरुन खाईकडे निघाली असतांना चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबविली. सर्व ३९ प्रवाशांचे प्राण वाचले. क्षणाचीही नजरचूक झाली असती तर अपघातात होणाऱ्या नुकसानीची कल्पनाही करवत नाही. एसटी बसमधील प्रवाशांसाठी चालकच देवदूत ठरला. अशा या देवदूताचा सत्कार वरठीकरांनी करुन आपली कृतज्ञता व्यक्त केली. नागरिकांनी चालक संदेश वाहने आणि वाहक सोपान तुंबडे यांचा सत्कार केला. यावेळी वरठीचे माजी सरपंच संजय मिरासे, ग्राम पंचायत सदस्य अतुल भोवते, उद्योजक मानिक शहारे, माजी मुख्याध्यापक हरिभाऊ भाजीपाले, चेतक डोंगरे आदींसह गावकरी उपस्थित होते. या अपघातात गोंधळलेल्या चालकाला मदत करण्यासाठी वरठी ग्रामपंचायतीचे सदस्य अतुल भोवते धावुन आले. अतुल आणि संदेश हे बालपणीचे मित्र. संकटाच्या काळात तो दिवसभर संदेशसोबत धावपळ करताना दिसत होता.चार तासांच्या प्रयत्नानंतर बस काढली बाहेरचाळीस फुट खोल दरीत उतरलेली बस काढण्याचा मार्ग सापडत नव्हता. अपघाताने गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या चालकाने बस काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु बस चिखलात फसली. जेसीबी मशीनची गरज होती. याबाबत उद्योजक माणिक शहारे यांना माहिती मिळाली. मात्र त्यांचा चालक सुट्टीवर होता. परिस्थितीचे गांभीर्य घेत त्यांनी स्वत: जेसीबी चालवित आणला. बस बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु झाले. मात्र समोर मार्गच सापडत नव्हता. त्यावेळी चेतक डोंगरे यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या घराचे कुंपन तोडून मार्ग मोकळा करुन दिला. चार तासानंतर ही बस बाहेर आली. बस बाहेर आल्यानंतर जेसीबी मशीनचे भाडे व तुटलेल्या कुंपनाच्या नुकसान भरपाईची विचारणा चालकाने केली. त्यावेळी मानिक शहारे व चेतक डोंगरे यांनी मोबदला घेण्यास नकार देत प्रवाशांचे जीव वाचविल्याबद्दल पाठ थोपटली.आमदार राजू कारेमोरेंकडून दखलआमदार राजू कारेमोरे यांना या भीषण अपघाताची आणि त्यातून ३९ प्रवाशी बचावल्याची माहिती मिळाली. ते सध्या मुंबई अधिवेशनाच्या निमित्ताने आहे. त्यांनी तात्काळ चालकाला मदत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. चालक वाहने यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

टॅग्स :Bus DriverबसचालकAccidentअपघात