शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास रे पठ्ठे; चार महिला तलाठ्यांनी केली रेती तस्करांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 14:36 IST

Bhandara News एकाच चौकटीत असलेलं काम व दुबळेपणाची भावना दूर करण्यासाठी त्या चार महिला तलाठ्यांनी रेती चोरांवर अंकुश लावण्यासाठी एकी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: एकाच चौकटीत असलेलं काम व दुबळेपणाची भावना दूर करण्यासाठी त्या चार महिला तलाठ्यांनी रेती चोरांवर अंकुश लावण्यासाठी एकी केली. जिल्ह्यातील बोथली रेती घाटावर जाऊन हल्ला बोल केला. वेगाने जात असलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला. अशा असाधारण महिला शक्तीची ताकद अख्या मोहाडीने बघितली.शक्ती, शौर्य व बुद्धी याची प्रचितीचा अनुभव मोहाडी तालुक्यातील चार महिला तलाठ्यांनी दिला.बोथली, मोहगाव देवी, नेरी आदी रेतीघाटावरुन रेतीची चोरी होत असते. तीन दिवसापूर्वी नेरी घाटावर रेतीचे चार ट्रॅक्टर पकडले गेले होते. या कारवाईत नेरीच्या महिला तलाठी निरंजनी मदनकर यांनी पुढाकार घेतला होता. आपण महिला तलाठ्यांचे पथक बनवून रेती चोरांवर धाड घालायची ही कल्पना मोहगाव देवी येथील तलाठी सरस्वता झाडे यांच्या मनात आली. महिला तलाठी निरंजनी मदनकर, सरस्वता झाडे, प्रिया बांते व मीरा शेंडे यांनी नियोजन तयार केले. एका कर्मचाऱ्यांच्या वाहनाने बोथलीच्या रेती घाटावर हल्लाबोल केला. त्यावेळी एक टॅक्टर मजुरांच्या हाताने रेती भरत होता. तलाठ्यांना पाहताच त्या टॅक्टर चालकाने पळ काढला. पण, त्या महिला तलाठ्यांनी योजनेनुसार पुरुष तलाठी मुख्य रस्त्यावर उभे केले होते. या चारही महिला तलाठ्यांनी पळणाऱ्या विना क्रमांक असलेल्या टॅक्टरला गाठले. रेती भरलेला ट्रॅक्टर पोलिस स्टेशन वरठी येथे लावण्यात आले. ट्रॅक्टर चालक रोशन दुर्योधन भुरे यांचे बयान पोलिस स्टेशन मध्ये नोंदवून घेतले आहे. रेती चोरीची तक्रार वरठी पोलिस ठाण्यात करण्यात आली. दहा हजार रुपयाची रेती चोरी व एक लाख २० हजार शास्ती व महसूल दंड आकारण्यात आला आहे.कठीण कार्य करण्यास महिला अग्रणी आहेत. आम्ही ते सिद्ध केले. महिलांच्या आत्मसन्मानाला नवीन दिशा मिळाणार आहे.सरस्वता झाडेतलाठी, मोहगाव देवी

टॅग्स :Governmentसरकारsandवाळू