शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे अनुदान रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 11:53 IST

५-६ हजारांचे अनुदान : टोल फ्रीवर कुणाशीच होत नाही संपर्क

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : गरोदर व अर्भक सुदृढ राहावा, या उद्देशाने शासनाने प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना सुरू केली, परंतु तुमसर शहर परिसरात मातांच्या मोठ्या प्रमाणात नोंदी होऊनही या योजनेचा लाभ मिळाला नाही. या योजनेचे अनुदान रखडले असून, टोल फ्री क्रमांकावर संपर्क होत नाही. अनुदान मिळण्यासाठी किती कालावधी लागेल असे सांगता येत नाही, असे लिखित उत्तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे या योजनेच्या यशस्वीतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेंतर्गत गरोदर व स्तनदा मातेला पहिल्या जीवित अपत्यासाठी पाच हजार रुपये, पहिला टप्पा तीन हजार शासनमान्य आरोग्य संस्थेमध्ये नोंदणी केल्यानंतर १५० दिवसांच्या आत पोर्टलला नोंदणी करणे आवश्यक असते. दुसरा टप्पा दोन हजार रुपये बाळाला १४ आठवड्यांचे लसीकरण पूर्ण केल्यानंतर व दुसरे जीवित अपत्य फक्त मुलीसाठी सहा हजार रुपये एकाच टप्प्यांमध्ये बाळाला १४ आठवड्यांचे लसीकरण पूर्ण केले. त्यानंतर आरोग्याची काळजी घेण्याकरिता आर्थिक लाभ लाभार्थीच्या आधार बेस बँक खात्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डीबीटीद्वारे जमा केला जातो.

लाभार्थी नोंदणी पीएमव्हीवाय पोर्टलला त्यांच्या कार्यक्षेत्रातील लॉगिन वरून करण्यात येते. इतर तांत्रिक सोपस्कार पार पाडावे लागतात. सदर लाभार्थी पडताळणी झाल्यानंतर लाभार्थीचे ऑनलाइन फॉर्मला मंजुरी देणे, तसेच पेमेंट जनरेट करण्याचे किंवा नामंजूर करण्याचे अधिकार तालुका आरोग्य अधिकारी यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मिळाले आहे.

डीएचओ म्हणतात, टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील लाभार्थीनी केलेल्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका व तालुका स्तरावरून वेळेमध्ये करणे गरजेचे आहे. याबाबत अधिक माहिती हेल्पलाइन नंबर या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. अनुदान मिळण्यास किती कालावधी लागेल याबाबत निश्चित सांगता येत नाही, असेही एका पत्रात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नमूद केले आहे. त्यामुळे येथील मातृत्व वंदना योजनेतील शेकडो लाभार्थीना किती काळ प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराgovernment schemeसरकारी योजना