शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

ई-निविदेबाबत ग्रामसेवक उदासीन

By admin | Updated: May 1, 2015 00:52 IST

आमगाव तालुक्यात शासनच्या विविध योजना अंतर्गत विकास कामांना गती देण्याचे कार्य संथगतीने असल्याचे दिसून येत आहे.

आमगाव : आमगाव तालुक्यात शासनच्या विविध योजना अंतर्गत विकास कामांना गती देण्याचे कार्य संथगतीने असल्याचे दिसून येत आहे. बांधकाम ई-निविदा प्रकाशित होत नसल्याने बांधकामेच रखडली आहेत. तर या विकास कामांवर पुढील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींची टांगती तलवार आहे. यामुळे विकास कामांवर कर्तव्य उदासिनतेचा फटका बसणार आहे.आमगाव तालुक्यात ६४ ग्रामपंचायतींच्या माध्यमाने विकास कामांची गती वाढावी यासाठी शासनाने विविध योजनेंतर्गत निधीचे आवंटन ग्रामपंचायतींना केले आहे. शासनाच्या विकास निधी अंतर्गत नागरिकांना मुलभूत सोई सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रशासनाचे कार्य तत्पर आहे. परंतु या विकास कामांना गतीशील करण्याचे कार्य ज्या व्यक्तींवर आहे त्यांच्याद्वारेच या विकास कामांना बगल देण्यात येत आहे. आमगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी विकास कामांचा आराखडा मंजूर करुन घेतला. या विकास कामांना पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे ई-निविदामार्फत कामांना गती देणे अपेक्षित आहे. परंतु शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवित असल्याची बाब ग्रामपंचायतीतून पुढे येत आहे. ई-निविदा प्रकाशित न करताच कामांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे बांधकाम करणाऱ्या एजन्सी व साहित्य पुरवठा करणारे ट्रेडर्स यांच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहे. बांधकाम ई-निविदेला बगल देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करुन विकास कामांची गुणवत्ता राखावी, अशी अपेक्षा नागरिक करीत आहे. (शहर प्रतिनिधी)ग्रामसेवक करतात मनमर्जीने नियोजनशासनाच्या विविध योजनांतर्गत विकासकांचे कार्य पूर्ण करण्यासाठी शासन नियमाप्रमाणे ठराविक निधी अंतर्गत निविदा प्रणालीने कार्य करणे आवश्यक आहे. बांधकाम करताना विविध साहित्याची मागणी, बांधकाम करणाऱ्या एजन्सीला निविदेद्वारे माहिती पुरविणे, साहित्य खरेदींची संपूर्ण सूचना या निविदेत अपेक्षित असते. परंतु या शासन नियमांना डावलून ग्रामसेवक कामांचा नियोजन स्वत:च्या मर्जीने करीत आहेत. त्यामुळे आॅनलाईन निविदा सूचना नोंदणीकृत बांधकाम करणाऱ्या एजन्सींना मिळत नाही. तर ग्रामपंचायत स्तरावर या निविदा मॅनेज करून परस्पर वाटण्यात येतात. त्यामुळे बांधकाम नियोजनाची गुणवत्ता पणाला लागत आहे.