ग्रामपंचायत निवडणुकीत नुसतेच मान धन कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:33 AM2021-03-28T04:33:47+5:302021-03-28T04:33:47+5:30

भंडारा : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील ७४१ शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावले होते. मात्र या ...

In the Gram Panchayat elections, only money will ever be given | ग्रामपंचायत निवडणुकीत नुसतेच मान धन कधी मिळणार

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसतेच मान धन कधी मिळणार

Next

भंडारा : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील ७४१ शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावले होते. मात्र या अधिकारी कर्मचाऱ्यांना अद्यापही निवडणुकीतील भत्ता मिळालेला नाही. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीचा भत्ताही अद्याप मिळाला नसल्याची ओरड आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मिळतोय आम्हाला मान, पण धन कधी मिळणार असे आता कर्मचारी म्हणत आहेत.

जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. त्यात निवडक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. मात्र उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबवताना यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, एआरओ, क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान कर्मचारी, शिपाई, पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. जानेवारीला मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ठरवून दिली होती. त्यातच कोरोनाचा संसर्ग असतानाच या निवडणुका आल्याने अतिरीक्त खर्चाला शासनाची परवानगी नसल्यानेही प्रशासनाची तारेवरची कसरत झाली. यासोबतच अधिकारी, कर्मचारी यांना कर्तव्य निभावताना स्वत:च्या खिशातूनही पैसा खर्च करावा लागला होता. किमान तो खर्च तरी आता दोन महिन्यानंतर परत मिळावा, अशी मागणी होत आहे.

या निवडणुकीत काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता मिळणे अपेक्षित होते. मात्र अद्याप हा भत्ता मिळाला नसल्याने हा भत्ता लवकर मिळावा अशी मागणी प्रशासनाकडे अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. त्यामुळे आमच्या श्रमाचा मोबदला तरी वेळेत द्यावा अशी मागणी होत आहे.

बॉक्स

विधानसभा निवडणुकीचा भत्ताही दोन वर्षापासून प्रलंबित

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा भत्ताही गत दोन वर्षापासून प्रलंबित असल्याची माहिती आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतीचा कारभार हा ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून चालविला जातो. ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया मात्र महसूल खात्याच्या माध्यमातून राबविण्यात येते. त्यासाठी लागणारा निधी ग्रामविकास विभागाकडून महसूल विभागाला मिळतो. त्यातूनच निवडणुकीचा संपूर्ण खर्च भागवावा लागतो. मात्र यावर्षी असलेल्या कोरोनाचे संकट व त्यात असलेला तोकड्या निधीमुळे काटकसर करून महसूल विभागाला निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कर्तव्य निभावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानधनाची अद्याप प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडलेल्या तालुकानिहाय गावांची संख्या

१ भंडारा ९४

२ तुमसर ९७

३ मोहाडी ७६

४ पवनी ७९

५ साकोली ६२

६ लाखनी ७१

७ लाखांदूर ६२

एकूण १४८ गावे

बॉक्स

जिल्ह्यात नव्याने निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या १४८

ग्रामपंचायत निवडणुकीत कर्तव्य निभावलेले अधिकारी १२१

ग्रामपंचायत निवडणुकीत कर्तव्य निभावलेले कर्मचारी ५९२

Web Title: In the Gram Panchayat elections, only money will ever be given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.