शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत प्रचाराचा धुरळा; आचारसंहितेची होतेय ऐशीतैशी..! प्रचारावर नियंत्रण कोणाचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 15:16 IST

आक्रमक भाषांनी पडतेय वादाची ठिणगी, प्रशासनाची करडी नजर

देवानंद नंदेश्वर

भंडारा : जिल्ह्यातील ३०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. प्रत्येक मतदाराला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे गावोगावी प्रचाराचा धुरळा उडत आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी असली तरी, सोशल मीडियावरील प्रचाराला निर्बंध कोणाचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आचारसंहितेस न जुमानता सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला की, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहिता लागू होते. ग्रामपंचायत निवडणुकीत तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. तालुकापातळीवर स्वतंत्र आचारसंहिता कक्षही स्थापन आहे. मात्र तरीही नियमांना न जुमानता सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे प्रचार रंगला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी चुरशीची निवडणूक होत आहे. निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असल्याने तिला चांगलाच रंग भरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारतोफा शुक्रवारी थंडावणार असल्या तरी आता प्रत्यक्ष भेटींवर भर दिला जाणार आहे.

एजन्सी मालामाल, नियमांना मात्र हरताळ! 

उमेदवारांना सोशल मीडियावरील पोस्ट तयार करून देण्यासाठी अनेकजणांनी व्यवसाय सुरू केला आहे. या एजन्सीनी गावातील पॅनेलच्या प्रचाराचे काम हाती घेत स्टेटससाठी पोस्ट तयार करून देणे. त्या व्हायरल करणे. ही कामे सुरू केली आहेत. परिणामी: आदर्श आचारसंहितेला मात्र अशा कृत्याने हरताळ फासला गेला आहे.

होऊन जाऊ दे खर्च, विचारतो कोण?

सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी खास टीम नेमण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे. खर्चाचे हिशोब तहसील कार्यालयात जमा करावयाचे आहेत. त्याच वेळी सोशल मीडियावर पेड जाहिराती केल्या तरीही त्याचा हिशोबच विचारला जात नसल्याने अनेक जणांनी याचा गैरफायदा घेण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.

आक्रमक प्रचार वाद निर्माण करतील

सोशल मीडियावर विशेषतः स्टेटसच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार आक्रमकपणे सुरू आहे. विरोधी उमेदवारावर थेट आरोप करीत प्रचार सुरू आहे. त्यामुळे यातून सध्या तरी किरकोळ वादावादीचे प्रकार घडले आहेत. याचे गंभीर परिणाम होणार नाहीत, यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारणElectionनिवडणूकbhandara-acभंडारा