शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शासन झाले उदार, सरपंचांना महिन्याला मिळणार १० हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 13:55 IST

जिल्ह्यात ५४५ उपसरपंचांना ४ हजार : मंत्रिमंडळाचा निर्णय, मानधन दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मुंबई येथील सरपंच संघटनेच्या आंदोलनाची राज्य शासनाने दखल घेतली. नुकतेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली आहे. आता सरपंचांना १० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे.

भंडारा जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. यापूर्वी राज्यातील सरपंच व उपसरपंचांना लोकसंख्येच्या प्रमाणात अतिशय कमी मानधन दिले जात होते. दिवाळीच्या तोंडावर सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ केली आहे. परंतु, झालेली वाढ अतिशय तोकडी असल्याची नाराजी सरपंच, उपसरपंचांकडून व्यक्त होत आहे. निर्णयाचा फेर विचार करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच या निर्णयाचे सरपंच व उपसरपंचाकडून स्वागतही होत आहे. 

जबाबदारीच्या तुलनेत अत्यल्प मानधन सरपंच व उपसरपंच हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे या पदाला शोभेल एवढे मानधन मिळणे अपेक्षित आहे. मात्र अत्यंत कमी मानधन मंजूर करण्यात आले. ही एक प्रकारची थट्टाच आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा. सरपंचांच्या सन्मानाला ठेच पोहोचविली जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. 

सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पटसरपंचांना १० हजारांपर्यंतआठ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सरपंचाला मासिक १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. पूर्वी पाच हजार मानधन होते. निर्णयानुसार मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

उपसरपंचांना चार हजारांपर्यंतगावाचे प्रथम नागरिक असलेल्या सरपंचाच्या तुलनेत उपसरपंचाला अर्धे मानधन दिले जाणार आहे. ८ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर उपसरपंचास चार हजार रुपये मासिक मानधन मिळणार आहे. 

वाढीव मानधनलोकसंख्या                                           मानधन ० ते २००० :                            ६००० (सरपंच) २००० (उपसरपंच)२००० ते ८००० :                     ८००० (सरपंच)  ३००० (उपसरपंच)८००० हून जास्त :                   १०,००० (सरपंच) ४००० (उपसरपंच)

"सरपंचपद प्रतिष्ठेचे व सन्मान वाढविणारे आहे. पूर्वी या पदाला साजेशे मानधन राज्य शासनाने देणे अपेक्षित होते. आता सरपंच संघटनेच्या मागणीला शासनाने प्रतिसाद देत मानधनात दुप्पट वाढ केली आहे. यावर आमचे समाधान आहे."- शिल्पा तुमसरे, सरपंच, पालोरा.

"दोन हजारापर्यंत लोकसंख्या असलेले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाला केवळ एक हजार रुपये मानधन होते. आता दोन हजार दिले जाणार आहेत. सरपंचांना किमान १५ हजार रुपये तर उपसरपंचास १० हजार रुपये सरसकट मिळायला पाहिजे होते." - गौरीशंकर राऊत, उपसरपंच, पांजरा

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतbhandara-acभंडारा