शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोरी लग्नाच्या झाल्या, पण वर पक्षाला दाखवायले घरच नाही जी...गोसे खुर्द प्रकल्पग्रस्तांची व्यथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 07:05 IST

‘धरणात ११ एकर वावर गेले. पैसे भेटले अन् संपलेही. तरी घरासाठी जागा भेटली नाही. लग्नाच्या पोरी झाल्या.

ज्ञानेश्वर मुंदेभंडारा :

‘धरणात ११ एकर वावर गेले. पैसे भेटले अन् संपलेही. तरी घरासाठी जागा भेटली नाही. लग्नाच्या पोरी झाल्या. त्यांना बघण्यासाठी पोरगं येतं. आलेल्या पावण्यायले बसवाले घरात जागा नाय. घरात ओल आणि छपरावर ताडपत्री पाहून पोरीले पोरगा पसंतच करत नाही. आता पोरीची सोयरीक कसी होईनजी?’ ही  व्यथा आहे गोसे प्रकल्पाने बाधित आणि पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांची. 

भंडारा तालुक्यातील पिंडकेपार टोलीच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रशासनाच्या लालफितीत अडकला आहे. १९६२ साली वैनगंगा नदीला पूर आला. तेव्हा मूळ गावातील ५४ घरांचे टोलीवर पुनर्वसन झाले. त्यानंतर गोसे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गाव आले. शेती पाण्याखाली गेली; पण टोलीचे पुनर्वसन झालेच नाही. गत दहा वर्षांपासून प्रशासनाची टोलवाटोलवी सुरू आहे. गाव पुनर्वसनात असल्याने कोणत्या सुविधाही मिळत नाहीत. दरवर्षी येणाऱ्या पुराने आणि बॅकवॉटरने घरांची अवस्था दयनीय झाली आहे.

रेशनचा भात, तो धके नाहीधरणात शेत जायच्या आधी आम्ही सुखी होतो. शेतात धान पिकत होते. घरी सुबत्ता होती. आता सर्व धरणात गेले, मजुरी करण्याची वेळ आली. घरात खाण्यासाठी रेशनचे तांदूळ आणावे लागते. कधी असा भात खाल्ला नाही, तो धके नाही (घशाखाली उतरत नाही). गोसेत शेती गेली अन् ही कंडिशन आली, अशी व्यथा इंदिराबाईंनी मांडली.

भाऊरावच्या घराला ‘टेकू’भाऊराव बाबरे यांचे घर पडायला आले आहे; पण घर बांधायला परवानगी नाही. दुसरा कोणताच पर्याय नसल्याने जीव मुठीत घेऊन त्याच घरात कुटुंबासह ते राहत आहेत. संपूर्ण घरात ओल असल्याने चटई अंथरावी लागते. घरात पाच फुटांपर्यंत ओल आहे. घरावर ताडपत्री टाकून भिंतीला टेकूचा आधार दिला आहे.

पावसाळा संपून हिवाळा लागला तरी घरात ओल आहे. भिंती ढासळत आहेत. पावसाळ्यात कवेलूच्या छपरावर ताडपत्री टाकून रहावे लागते. आमची १२ एकर शेतीपैकी धरणात ११ एकर गेली. आता एक एकरातील पिकावर जगावे लागते. मुलगी बीएस्सी झाली. मुलगा बारावीला आहे. मुलीच्या लग्नाची चिंता आहे. असे घर पाहून आमच्यासोबत कोण सोयरीक करणार?- इंदिराबाई साठवणे

घरात दोन जनावरे बांधायला जागा नाही. घरात ओल असते. रात्री साप, विंचवाची भीती असते. आम्ही येथून जायला तयार आहो; पण सरकार काही करायला तयार नाही.- आशा वंजारीघर पडत आहे, तरी मदत मिळत नाही. इतर गावात मदत मिळते, आम्ही काय गुन्हा केला? - शोभा मते