धरणाची पाहणी : जलसंपदामंत्री महाजन यांचे आश्वासनपवनी : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाला पूर्ण करण्याकरिता निधीची गरज आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत. पुनर्वसनाचा प्रश्न मुख्य आहे. प्रकल्पाच्या विविध समस्या तातडीने मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. गोसेखुर्द धरणाला भेट देऊन पाहणी करण्यासाठी ना.महाजन आज धरणस्थळी आले होते. गोसीखुर्द धरणावर आगमन झाल्यानंतर प्रथमेश कंपनीच्या कार्यालयाला भेट देऊन धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचा आराखडा समजून घेतला. त्यानंतर गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यांच्या मागण्यांसंदर्भात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. गोसीखुर्द धरणाचे सिंचनापासून वंचित राहणाऱ्या गोसेखुर्द, गोसेबुज, मेंढा, वासेळा या गावांच्या सिंचनासाठी प्रयत्न करण्याचे आदेश महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर ना.गिरीश महाजन यांनी वाही येथील विश्रामगृहात धरणासंबंधीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, आ.रामचंद्र अवसरे, उमरेडचे आ.सुनिल पारवे, धरण विभागाचे कार्यकारी अभियंता वर्धने, कार्यकारी अभियंता (पुनर्वसन) वराडे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती अरविंद भालाधरे, जिल्हा परिषद सदस्य हंसा खोब्रागडे, पवनीचे माजी नगराध्यक्ष मोहन सुरकर, भाजपचे महामंत्री अनिल मेंढे, रामकुमार गजभिये, हरीश तलमले, राजेंद्र फुलबांधे, धनराज जिभकाटे, माधुरी नखाते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
गोसेखुर्द प्रकल्प बाधितांच्या समस्या प्राधान्याने सोडवू
By admin | Updated: December 13, 2014 22:32 IST