गोसेच्या अपूर्ण कालव्याने सिंचनाचे स्वप्न धुळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:00 AM2019-12-19T06:00:00+5:302019-12-19T06:00:29+5:30

पवनी तालुक्यातील गोसे येथे महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ३७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सध्या १४ हजार ९९९ कोटीवर जाऊन पोहचला आहे. परंतु अद्यापही या प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्णपणे झाले नाही. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या पाण्याचा मोठा फायदा होऊन समृद्धी येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Goose's dream of irrigating through an incomplete canal | गोसेच्या अपूर्ण कालव्याने सिंचनाचे स्वप्न धुळीस

गोसेच्या अपूर्ण कालव्याने सिंचनाचे स्वप्न धुळीस

Next
ठळक मुद्देलाखांदूर तालुका : कालव्याचे काम पूर्ण होणार तरी केव्हा ?

दयाल भोवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणारा आणि राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या कालव्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिंचनाची आस लावून बसलेले शेतकरी कालव्याचे काम पूर्ण केव्हा होणार असा प्रश्न करीत आहेत.
पवनी तालुक्यातील गोसे येथे महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ३७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सध्या १४ हजार ९९९ कोटीवर जाऊन पोहचला आहे. परंतु अद्यापही या प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्णपणे झाले नाही. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या पाण्याचा मोठा फायदा होऊन समृद्धी येणार असल्याचे सांगितले जात आहे. या धरणाचा डावा कालवा ४२ किलोमीटरचा तर उजवा कालवा ११० किलोमीटरचा आहे.
१९८८ सालापासून विविध दिव्यांना सामोरे जात या प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण करण्यात आले. तर डाव्या कालव्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. डाव्या कालव्यामुळे लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांना सिंचनासाठी पाणी मिळणार होते, परंतु ही समस्या सुटायला तयार नाही. मोहरना, खैरना, दोनाड, नांदेड, इटाण येथील शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. धान उत्पादक शेतकºयांना या भागातून गेलेल्या डाव्या कालव्याचे पाणी मिळत नाही. उलट सोडलेले पाणी सरळ चुलबंद नदीत वाहून जाते. याचा फायदा शेतकºयांना होत नाही. त्यासाठी पारी बनविण्यात याव्या, गेटची सुविधा करावी आदी मागण्या करण्यात आल्या. परंतु अद्यापपर्यंत यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. आणखी किती वर्ष या प्रकल्पातील पाण्याची प्रतीक्षा करावी लागेल असा प्रश्न या भागातील शेतकरी करीत आहेत. धान उत्पादक शेतकºयांना या प्रकल्पापासून मोठी अपेक्षा आहे. परंतु विविध कारणाने प्रकल्पाचे पाणी मिळतच नाही.

विविध समस्या कायम
लोकप्रतिनिधी आणि शेतकºयांनी वारंवार गोसे प्रकल्प प्रशासनाला सिंचनासंदर्भात निवेदने दिलीत. परंतु या समस्यांचे निराकरण झाले नाही. लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील कालव्यांच्या विविध समस्या कायम आहेत. गेल्या दोन तीन वर्षात समस्या निकाली निघाल्या नाहीत. आणखी अनेक वर्ष सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागेल हे मात्र तेवढेच खरे.

Web Title: Goose's dream of irrigating through an incomplete canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.