सत्कार कार्यक्रम : राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पाराणी दिदी यांचे प्रतिपादनवरठी : परमेश्वराने दिलेले आयुष्य अमुल्य आहे. प्रत्येकजण स्वत:साठी जगतो. पण दुसऱ्यासाठी जगण्यात खरा अर्थ दडलेला आहे. जो दुसऱ्यासाठी जिवन जगतो त्याला खरा आनंद व सुख मिळतो. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात दुसऱ्यासाठी जीवन जगणाऱ्या अनेकानी आपले आयुष्य समर्पित केले आहे. जगातील दु:ख दूर करण्यासाठी व मानवकल्याण हे ध्येय ठेवून जिवन जगणाऱ्यात या केंद्राचे मोठे योगदान आहे. म्हणून प्रत्येकाने स्वत:च्या सुख दुख:च्या चक्रव्यूहात न अडकता आपल्या जीवनातील काही क्षण हे ईश्वरीय सेवेत द्यावे, असे आवाहन राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पाराणी यांनी केले.प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयात १५ वर्षापेक्षा जास्त काळ सेवा देणाऱ्या भारतातील २५ हजार ब्रह्मकुमारीजचा सत्कार मुख्य केंद्र राजस्थानातील माऊंट आबू येथे करण्यात आला. यात वरठी येथील चार ब्रह्मकुमारी यांचा समावेश होता. त्याप्रित्यर्थ त्यांचा सत्कार वरठी केंद्राच्या वतीने करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून सनफ्लॅग स्कूलचे प्राचार्य सी.जे. धर, एन.जे. पटेल महाविद्यालय मोहाडीचे प्राचार्य डॉ. ज्योती पांडे, सरपंच संजय मिरासे, पंचायत समिती सदस्य रवि येळणे उपस्थित होते.यावेळी ब्रह्मकुमारी रेखा दिदी, राधा दीदी, लता दिदी व चन्द्रकला दिदी यांचा राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पाराणी यांच्या हस्ते सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषा दिदी यांनी केले होते. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व केंद्राचे सेवक उपस्थित होते. (वार्ताहर)
जीवनातील काही क्षण दुसऱ्यांना द्या
By admin | Updated: October 13, 2014 23:18 IST