शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

घाटांचा लिलाव नाही, बांधकाम जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:52 IST

जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसतांना सर्वत्र बांधकाम मात्र जोमात सुरू आहे. या बांधकामासाठी येणारी रेती नेमकी कोठून येते, हे सांगायला कुण्या तज्ज्ञांची गरज नाही. लिलावापूर्वीच रेतीघाटांमध्ये मशीनच्या सहाय्याने खनन सुरू आहे.

ठळक मुद्देरेती तस्करीला उधाण : खनिकर्म व महसूल विभागाचे साटेलोटे, रेतीचे प्रचंड साठे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसतांना सर्वत्र बांधकाम मात्र जोमात सुरू आहे. या बांधकामासाठी येणारी रेती नेमकी कोठून येते, हे सांगायला कुण्या तज्ज्ञांची गरज नाही. लिलावापूर्वीच रेतीघाटांमध्ये मशीनच्या सहाय्याने खनन सुरू आहे. खनिकर्म आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी रेती तस्करांच्या दावणीला बांधल्याचे दिसत आहे. कारवाईचा केवळ फार्स करून तस्करांना रेतीघाट मोकळे करून दिले जात आहे.भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या विशाल पात्रात रेतीचा प्रचंड खजाना आहे. वैनगंगेतील रेतीला प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच या रेतीचे उत्खनन करण्यासाठी प्रचंड स्पर्धा सुरु असते. वैनगंगेसोबतच जिल्ह्यातील चुलबंद, सुरनदी, बावनथडी या मोठ्या नद्यांसह अनेक लहान नाल्यांमधूनही रेतीचे उत्खनन केले जाते. रेती उत्खननासाठी महसूल विभाग लिलावाच्या माध्यमातून कंत्राट दिले जाते. नियमानुसार याठिकाणी उत्खनन करणे गरजेचे असते. यातील महत्वाचा नियम म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त असेच उत्खनन करावे लागते. रात्रीच्यावेळी उत्खनन करता येत नाही. तसेच ट्रेझर बोर्ड अथवा जेसीबी मशीनच्या साहायाने उत्खननावर प्रतिबंध असतो. पंरतु एकदा कंत्राट मिळाले की मनमानेल त्या पध्दतीने रेतीचे उत्खनन केले जाते. यंदा तर एकाही रेती घाटाचा लिलाव अद्याप झाला नाही. मात्र रेतीचे खुलेआम उत्खनन सुरु आहे. अहोरात्र रेतीचे वाहने धावत असतात. अनेकांनी तर घाटाचा नजिक रेतीचे साठे तयार केले आहे. या ठिकाणावरुन रेतीची विक्री केली जाते.अवैध रेती तस्करीवर आळा घालण्याची जबाबदारी महसूल विभागाची असते. उपविभागीय अधिकारी ते तलाठी यांची या रेती तस्करीवर आळा घालण्याची जबाबदारी असते. त्यासाठी महसूल विभाग पथकही तयार करते. तहसीलदारांच्या नेतृत्वातील भरारी पथक कारवाई करते. पंरतू या कारवाईचेही मोठे गोडबंगाल असते. पोलीस विभागही या कारवाईत सहभागी होतात. परंतू अद्यापपर्यंत रेतीतस्करांवर मोठी कारवाई झाली नाही.भंडारा जिल्ह्यासह सर्वत्र वैनगंगेची रेती उपलब्ध होत आहे. लिलाव झाले नसतांनाही बांधकाम जोमात सुरु असल्याने ही रेती नेमकी कुणाच्या आशीर्वादाने पोहचते हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत सर्वांचेच यात हात ओले केल्या जातात. मात्र या सर्व प्रकारात पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे.पर्यावरणप्रेमींचे दुर्लक्षवन्यजीवांचा संदर्भात गळा काढणारे पर्यावरण प्रेमी राज्यात सुरु असलेल्या रेती तस्करहीबद्दल एक शब्दही बोलायला तयार नाही. पर्यावरण विभागाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही रेतीघाटाचा लिलाव करता येत नाही. मात्र भंडारा जिल्ह्यात लिलावापूर्वीच उत्खनन सुरु आहे. त्यामुळे पर्यारणाचे प्रचंड नुकसान होत आहे. वाहतुकीमुळे बांधकाम विभागाच्या रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. नद्यांची नैसर्गिक संरक्षण भिंत थडीही वाहतूकीसाठी खचविल्या जात आहे. हा सर्व प्रकार बिनबोभाट सुरु असतांना पर्यावरण प्रेमी मूग गिळून आहेत.