शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

करडीच्या विकासाला लागले रस्त्यावरील खड्ड्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:39 IST

करडीच्या ग्रामच्या विकासाला खड्ड्यांचे ग्रहण लागल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. ही स्थिती निर्माण होण्यासाठी अनेक करणे असली तरी सबंधित विभागाची व अधिकाऱ्यांची विकासाप्रतीची उदासीनता प्रमुख ठरली आहे. विकासाच्या नावावर झालेल्या कामांना वर्ष, दीड वर्षातच खड्ड्यांची कीड लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडीच्या ग्रामच्या विकासाला खड्ड्यांचे ग्रहण लागल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. ही स्थिती निर्माण होण्यासाठी अनेक करणे असली तरी सबंधित विभागाची व अधिकाऱ्यांची विकासाप्रतीची उदासीनता प्रमुख ठरली आहे. विकासाच्या नावावर झालेल्या कामांना वर्ष, दीड वर्षातच खड्ड्यांची कीड लागली आहे. करडी पोलीस ठाणे समोरील गावातील मुख्य रस्त्याची ‘अवदसा’ पाहावली जात नाही. रस्त्याच्या दुरावस्थवेर संशोधन करण्याची वेळ करडीवासीयांवर आली आहे.करडी ही परिसराची व्यापार नगरी म्हणून तालुक्यात ओळखली जाते. त्याचबरोबर आठवडी बाजाराचे प्रमुख केंद्र म्हणूनही नव्याने ओळख निर्माण करण्यात यश आले आहे. गावाच्या सौदर्यात भर पाडण्याचा भाग म्हणून काही चौकात सौंदर्यीकरणाचे काम व प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील रस्ता सिमेंटीकरणाने रुंद करण्यात आले.गावातील घरकुल व शौचालयाचे प्रश्न दूर करण्यात बराच वेळ खर्ची पडला. मात्र, आजही शौचालयाचा प्रश्न पूर्णत: सुटलेला नाही. आजही गावाच्या बाहेरील रिंग रोडवर पहाटेच्या सुमारास नागरिक शौचाला बसलेले दिसून येतात. करडी ग्रामला स्मार्ट ग्राम करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाल्याचे मध्यंतरी सांगण्यात आले.विकासाची ब्लू प्रिंट तयार असल्याचे बोलले गेले. मात्र, कागदावरील स्वप्न कुठे हवेत मुरले, कुणालाही समजेनासे झाले आहे. गरदेव चौकापासून करडी गावाला जोडणारा मुख्य पोर्च मार्ग अजूनही दुरवस्थेच्या अनेक कहाण्या सागत सुटला आहे. या मार्गावर खड्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न झाले. डांबर रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला. मात्र, मुरुम रस्त्यावर आता चिखलच चिखल पसरल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी मुरुम वाहून गेल्याने रस्त्याच मातीमोल ठरला आहे. गरदेव ते बाजार चौक, गांधी पुतळ्याच्या समोरपर्यंत डांबर रस्त्याला सिमेंट रस्त्यात रुपांतरीत करण्याशिवाय आता पर्याय नाही, असे नागरिकांचे मत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस