शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आता बस स्थानकांवर घ्या मोफत उपचार ! राज्यातील ३४३ बस स्थानकांवर 'आनंद आरोग्य केंद्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 13:47 IST

महामंडळाची योजना : आनंद आरोग्य केंद्रामार्फत होणार तपासणी, प्रवाशांना मिळणार दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध सवलती दिल्या जात आहेत. आता महामंडळाने बस स्थानकांमध्ये आरोग्य सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने राज्यातील ३४३ बस स्थानकांवर 'आनंद आरोग्य केंद्र' नावाने दवाखाना सुरू केला जाणार असल्याची घोषणा नवनियुक्त अध्यक्षांनी केली. यानुसार बस स्थानकांच्या ठिकाणी सर्व नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यासह कमी दरात विविध चाचण्या आणि औषधी मिळण्यास मदत होणार आहेत.

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन एसटी महामंडळाची लालपरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावत आहे. त्यामुळे प्रवासीही वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन, अशी भूमिका घेत आहेत. सुरक्षित प्रवासाची हमी असल्याने अनेकजण एसटीला प्राधान्य देतात. दरम्यान, शासनाने विविध घटकांतील प्रवाशांसाठी प्रवासात सवलती दिल्याने दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. त्यातच आता महामंडळाने बस स्थानकात प्रवाशांना 'आनंद आरोग्य केंद्र' नावाने दवाखाना सुरू केला जाणार आहे. लवकरच प्रवाशांच्या सेवेत आरोग्य केंद्र सुरू होणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान आता आरोग्यसेवेचाही लाभ मिळण्यास मदत होणार आहे. भंडारा येथील आगारात आनंद आरोग्य केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची आशा पल्लवीत झाली आहे. 

चालक, वाहकांची मोफत तपासणी एसटीच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी चालक, वाहकांवर मोठी भिस्त आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी ४० वर्षांवरील चालक-वाहकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यात सीबीसी, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, ईसीजी, मॅमोग्राफी (महिलांसाठी) आदींची बस स्थानकातच तपासणी केली जाणार आहे.

बस स्थानकावर लवकरच सुरू करणार केंद्र भंडारा विभागांतर्गत असलेल्या बस स्थानकांवर 'आनंद आरोग्य केंद्र' अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. शासनाच्या आदेशानुसार लवकरच बस स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र स्थापन केले जाणार आहेत.

काय आहे आनंद आरोग्य केंद्र ?धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील एसटीच्या सर्व बस स्थानकांत 'आनंद आरोग्य केंद्र नावाने दवाखाना सुरू केला जाणार आहे. यात माफक दरात बसस्थानकातील प्रवाशांच्या आरोग्य चाचण्या, औषधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे

आरोग्य चाचणी केंद्र सुरू करण्यात येणारएसटी महामंडळाकडून राज्यातील विविध जिल्ह्यांतील बस स्थानकांत 'आनंद आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यात माफक दरात आरोग्य चाचणी, औषधी दिल्या जाणार असून, लवकरच सेवेला सुरुवात केली जाणार आहे. यात प्रवाशांसह एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

टॅग्स :bhandara-acभंडारा