शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
2
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
3
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
4
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
5
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
6
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
7
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
8
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
9
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
10
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
11
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
12
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
13
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
14
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
15
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
16
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
19
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
20
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

By admin | Updated: March 17, 2015 00:37 IST

मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद भंडाराची सर्वसाधारण सभा

सदस्यांनी वाचला समस्यांचा पाढा : सिंचन, कृषी, आरोग्य, शिक्षण नक्षलग्रस्त भत्ता आदी विषयांवर रंगली चर्चाभंडारा : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद भंडाराची सर्वसाधारण सभा आज पार पडली. वित्तीय वर्षाची तथा सदस्यांच्या पंचवार्षीक योजेतील ही अखेरची सभा विविध मुद्यांनी गाजली. जिल्हा परिषद सभागृहात सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी या होत्या. यावेळी उपसभापती रमेश पारधी, महिला बाल विकास सभापती रेखा भुसारी, अर्थ व बांधकाम सभापती संजय गाठवे, कृषि सभापती संदीप टाले, समाजकल्याण सभापती अरविंद भालाधरे या पदाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल द्विवेदी यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.चालू वित्तीय वर्षाची तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यकाळातील ही शेवटची आमसभा असल्याने या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. जिल्हा परिषद सदस्यांसह सातही तालुक्यातील पंचायत समिती सभापती उपस्थित होते. या सभेत सिंचन, कृषि, आरोग्य, शिक्षण व नक्षलग्रस्त भत्ता यावर चर्चा रंगल्या. जिल्ह्यात कृषि मेळावे कागदोपत्री दाखवून खर्च उचलण्यात आला असून त्याचा शेतकऱ्यांना पाहिजे तसा लाभ झाला नसल्याचा आरोप यावेळी तुमसर पंचायत समितीचे सभापती कलाम शेख यांनी रेटून धरला. यावेळी जिल्हा परिषद सभापतींनी त्यांना माहिती अवगत करून देण्याचा प्रयत्न केला. अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० टक्के सुटीवर महाबिजची बियाणे देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी लावून धरली. यावेळी डॉ. हरेंद्र रहांगडाले यांनी महाबिजची बियाणे बोगस असल्याचा आरोप लावून अन्य कुठल्याही कंपनीची बियाणे पुरवठा करण्याची मागणी केली.खरीप हंगामासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांना कृषि विभागाने बियाणांचा पुरवठा करावा व यासाठी जिल्हा परिषदने तरतुद करण्याची मागणी लावून धरली. यावर उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी बियांसाठी सहा कोटींची गरज असल्याचे सांगून तशी तरतुद करण्याचे आश्वासन दिले. मात्र सर्व शेतकऱ्यांना सुटीवर बियाणे दिल्यास जे ३० टक्के शेतकरी स्वत:चे बियाणे वापरतात असेही शेतकरी मोफत बियांणांची मागणी करतील यामुळे काही शेतकरी वंचित राहण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे कृषी सभापती संदीप टाले यांनी सांगितले.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाच्या शेतीचे संरक्षणासाठी शासकीय योजनेतून संरक्षण जाळी पुरवठा करण्याची मागणी सभापती शेख व गीता कापगते यांनी लावून धरले. जिल्ह्यातील साकोली लाखांदूर व लाखनी या तीन तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना नक्षलभत्ता मिळतो. त्याच धर्तीवर या तालुक्यांच्या विकासासाठी शासनाने नक्षलभत्ता विकास निधी मिळावा, अशी मागणी भरत खंडाईत यांनी रेटून धरली. विकास निधी मिळत नसल्यास नौकरदार वर्गांचा नक्षलग्रस्त भत्ता बंद करण्यासंदर्भात सभेने ठराव पारित करावा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली. अनेक गावात विकासाची गरज नसतानाही केवळ मर्जीतील कंत्राटदारांना कामे मिळावी यासाठी विकासाच्या नावाने कामे सुरू असल्याचा आरोप वसंता एंचिलवार यांनी लावून धरला. गरजेच्या व संवेदनशील गावात विकास साधण्यासाठी जिल्हा परिषदेने ठोस उपाययोजना करून त्याची योग्य अंमलबजावणी करावी, अशी मागणीही रेटण्यात आली. विविध मुद्यांवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी थातूरमाथूर माहिती दिल्याने समाधान न झालेल्या सदस्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. (शहर प्रतिनिधी)