शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दारूने भरलेला ट्रक पळविणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:19 IST

पवनी तालुक्यातील भावड येथील देशी दारूच्या दुकानासमोरून दारू भरलेला ट्रक आरोपींनी पळवून नेला. ही घटना शनिवारी घडली.

ठळक मुद्देसहा आरोपींना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पवनी तालुक्यातील भावड येथील देशी दारूच्या दुकानासमोरून दारू भरलेला ट्रक आरोपींनी पळवून नेला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी ट्रक पळवून नेणाºया सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २० लाख १२ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शुभम रामटेके (२३) रा.लाखांदूर, संदीप रायपुरे (२९) रा.ब्रम्हपुरी, दुर्गेश भसाखेत्रे (२८) रा.ब्रम्हपुरी, व्यंकटेश ताडपल्लीवार (३२) रा.गडचिरोली, शफ्फू पठान (१८) रा.गडचिरोली, रफिकखान वहिद खान (२७) रा.नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. साकोली येथून एमएच ३५ के ११०७ या ट्रकमध्ये देशी दारूच्या ७२५ पेट्या भरून हा दारूसाठा भावड येथील देशी दारू दुकानदाराला पुरवठा करण्यात आला. मात्र सदर ट्रक रात्री उशिरा पोहचल्याने दुकान बंद झाले होते. त्यामुळे दारूसाठा भरलेल्या ट्रकसह मजूर रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून झोपले होते.दरम्यान एका वाहनाने आलेले आठ इसम तिथे येऊन ट्रक चालकाला धमकावत चाव्या हिसकावून ट्रक घेऊन पळाले. याची तक्रार अड्याळ व पवनी पोलिसांना करण्यात आली. पोलीस मागावर असल्याचे लक्षात येताच ते ट्रक सोडून पळाले. यात शुभम रामटेके (२३) रा.लाखांदूर हा सापडला.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या पथकाने शुभमने दिलेल्या माहितीवरून सापळा रचून उर्वरित आरोपींना अटक केली. या आरोपींकडून २० लाख १२ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मुख्य आरोपीसह अन्य काही आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस सुरू आहे.