शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

अग्निशमन वाहनाचे साकोलीत गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर साकोली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषदेत झाले. त्यामुळे शहराचा कायापालट होईल असे वाटत होते. निवडणुका पार पडल्या. भाजपाची एक हाती सत्ता आली. सुरुवातीचे काही दिवस सर्वकाही आलवेल होते. मात्र विधानसभेच्या निवडणूक पार पडताच अध्यक्ष विरुध्द नगरसेवक युध्द सुरु झाले.

ठळक मुद्देनगरपरिषद : रजिस्ट्रेशन झाले पण वाहन पोहचलेच नाही

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : अग्निशमन दलाच्या वाहनासाठी साकोली नगरपरिषदेत मोठे राजकारण झाले. वादविवाद झाले. एवढेच नाही तर नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्नही केला. नगराध्यक्ष रजेवर गेल्या. मात्र अग्निशमन दलाचा वाहनाचा घोळ सुटता सुटेना. लॉकडाऊन असताना या वाहनाचे आरटीओ कार्यालयातून रजिस्ट्रेशन झाले. मात्र तरीही वाहन अद्यापपर्यंत साकोलीत पोहोचलेच नाही. त्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन चोरीला तर गेले नाही ना? असा प्रश्न साकोली वासीयांना पडला आहे.प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर साकोली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषदेत झाले. त्यामुळे शहराचा कायापालट होईल असे वाटत होते. निवडणुका पार पडल्या. भाजपाची एक हाती सत्ता आली. सुरुवातीचे काही दिवस सर्वकाही आलवेल होते. मात्र विधानसभेच्या निवडणूक पार पडताच अध्यक्ष विरुध्द नगरसेवक युध्द सुरु झाले. सुरुवातीला नगराध्यक्ष धनवंता राऊत या नगरसेवक व समिती सभापतींना विश्वासात न घेता काम करतात, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. नंतर नगरपरिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या अग्निशमन दलाच्या वाहन खरेदीत घोळ झाल्याचा आरोप सुरु झाला. यावरही नगरसेवक थांबले नाही. त्यांनी नगराध्यक्षावर अविश्वास आणण्याचा हालचाली सुरु केल्या.याप्रकरणाची दखल घेत आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार बाळा काशीवार यांनी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांची एक बैठक घेतली. मात्र त्याही बैठकीत तोडगा निघाला नाही. शेवटी फेब्रुवारी महिन्यात नगराध्यक्ष राऊत दिर्घ रजेवर गेल्यात. प्रभार उपाध्यक्ष जगन उईके यांच्याकडे आला. मुख्याधिकारी परिहार यांचे स्थानांतरण झाले. मुख्याधिकारी म्हणून माधवी मडावी रुजू झाल्या. अग्निशमन दलाच्या वाहनाच्या वादातून एकाच वेळी नगराध्यक्ष रजेवर गेले अन् मुख्याधिकारी यांचे स्थानांतरण झाले. यावेळी साकोलीत शंकाकुशंकाना उधाण आले.यानंतर लॉकडाऊन झाले. त्यामुळे प्रकरण शांत झाले. मात्र ३० एप्रिल रोजी नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनाचे भंडारा आरटीओ कार्यालयातून रजिस्ट्रेशन झाले आणि पुन्हा नगरसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली. या वाहनाचा क्र. एम एच ३६ एए २०५४ असा असून विमा फेब्रुवारी २०२१ पर्यंत आहे. नियमाप्रमाणे रजिस्ट्रशेन झाल्यावर सदर वाहन नगर परिषद कार्यालयाला हस्तांतरीत करणे गरजेचे होते. मात्र आता रजिस्ट्रेशन होऊन ११ दिवसांचा कालावधी लोटला तरी सदर वाहन साकोली नगरपरिषदेमध्ये आले नाही. त्यामुळे यात काही तरी गोडबंगाल आहे, अशा चर्चा साकोलीत सुरु आहे.वाहनाची किंमत ९१ लाख ५० हजाच्\साकोली नगरपरिषदेने खरेदी केलेल्या या अग्निशमन वाहनाची किंमत ९१ लाख ५० हजार रुपये आहे. आतापर्यंत साकोली नगरपरिषदेतर्फे या वाहनासाठी ७१ लाख रुपये दिले आहे. मात्र या सर्व प्रकाराला नगरसेवकांचा विरोध आहे.मुख्याधिकाऱ्यांचे स्थानांतरण तडकाफडकी कसे?दलाचा वाहनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रकरण उजेडात आले. त्यानंतर अवघ्या दहा दिवसात तत्कालीन मुख्याधिकारी परिहार यांचे स्थानांतरण झाले. त्यांचे तडकाफडकी स्थानांतरण कसे असा प्रश्न विचारला जात आहे.अग्निशमन वाहनाचे ३० एप्रिल रोजी रजिस्ट्रेशन झाले. त्यानंतर ही गाडी साकोलीत न आणता सोलापूरला का ठेवण्यात आली. त्यामुळे नगरपरिषदेतर्फे ९ मे रोजी फायर सर्व्हिस कंपनीला तीन दिवसाचा आत वाहन परत करा अन्यथा तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार करु असे पत्र दिले आहे.- माधुरी मडावी, मुख्याधिकारी