संगम येथे भरते मद्यपींची जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:55+5:30

कोरोना व्हायरस रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यातच संचारबंदी व जिल्हा बंदीही लागू करण्यात आली आहे. लोकांनी एकत्र गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातच हॉटेल्स, रेस्टारंट, देवस्थाने, पानटपरी, देशी, विदेशी दारुची दुकाने आदी प्रतिष्ठाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

A gathering of drunkards at Sangam | संगम येथे भरते मद्यपींची जत्रा

संगम येथे भरते मद्यपींची जत्रा

Next
ठळक मुद्देआदेशाचे उल्लंघन : संचारबंदीलाही खो, स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असतानाच राज्य शासनानेही गंभीर पावले उचलली आहेत. गर्दी टाळण्यासाठी विविध दुकाने व आस्थापना बंद करण्याचे आदेशही दिले आहेत. यात हॉटेल्स, देशी विदेशी दारुची दुकाने व पानटपरी बंद असल्याने मद्यप्राशन करण्यासाठी संगम येथे मद्यपींची गर्दी पहायला मिळत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे सरळसरळ उल्लंघन होत आहे.
कोरोना व्हायरस रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यातच संचारबंदी व जिल्हा बंदीही लागू करण्यात आली आहे. लोकांनी एकत्र गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातच हॉटेल्स, रेस्टारंट, देवस्थाने, पानटपरी, देशी, विदेशी दारुची दुकाने आदी प्रतिष्ठाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागात शासनाच्या आदेशाला न जुमानता राजरोसपणे दारुची दुकाने सुरु ठेवल्याने मद्यपींची जत्रा पहायला मिळत आहे. असाच प्रकार भंडारा शहरालगत असलेल्या संगम पुनर्वसन येथे पहायला मिळत आहे. येथे दारुची दुकाने सुरु असल्याने परिसरातील भंडारा शहर, गणेशपूर, भोजापूर, बेला, दवडीपार, पिंडकेपार, मुजबी, जाख, फुलमोगरा, कवडसी, उमरी, मारेगाव, शहापूर आदी गावातून तळीराम संगम येथे दारु पिण्यासाठी येत आहेत. परिणामी येथील सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली आहे.
या संबंधात स्थानिक प्रशासनाची भूमिकाही संशयास्पद दिसत आहे. प्रशासनाने ही दारुची दुकाने बंद करून गावाल व्हायरसच्या प्रादूर्भावाला वाचवावे अशी मागणी गावकरी करीत आहेत.

बिसलरीच्या बॉटलमधून दारुची विक्री
दारु विक्रेत्यांनी दारु विकण्यासाठी अनोखी शक्कल लढविली आहे. बिसलरीच्या बॉटलमध्ये दारु पार्सल म्हणून दिली जाते. तसेच ग्रामपंचायत प्रशासनातील एका पदाधिकाऱ्याला हाताशी धरून आठ दिवसांपासून गावातील पथदिवे बंद ठेवले जात आहेत. याच अंधाराचा फायदा घेत मद्यपींना दारुची विक्री केली जात आहे. दारु विक्रेत्यांनी दारुचा मुबलक साठा केल्याने मागेल त्याला तेवढे दारु दिली जात आहे. संगम येथील या प्रकाराने कायदा व सुव्यवस्थेचे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. यावर कारवाई करावी अशी सर्वस्तरातून मागणी होत आहे.

 

Web Title: A gathering of drunkards at Sangam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.