शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गाबाईच्या डोहात पवित्र स्रानासाठी भाविकांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

यात्रेत जिल्ह्यासह नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यातील भाविक येत असतात. या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे. मकरसंक्रातीच्या शुभ पर्वावर भरणारी यात्रा चार ते पाच दिवस चालते. या यात्रेत पारंपारिक हस्तकलेने तयार केलेल्या गृहोपयोगी साहित्याची दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते.

ठळक मुद्देकुंभली येथे आजपासून यात्रा महोत्सव: पोलिसांचा चोख बंदोबस्त, घोड्यांच्या बाजारासाठी यात्रा प्रसिद्ध

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील कुंभली येथील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभली येथील दुर्गाबाई डोहच्या यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या डोहात श्रध्देने स्नान करण्यासाठी हजारो भाविक येतात. मंगळवारी पहाटेपासून या पवित्र स्नानाला प्रारंभ होणार आहे. दुर्गाबाई देवी व त्यांच्या सात भावांचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे भक्तीभावाने येतात.विदर्भात प्रसिध्द असलेला या यात्रेत जिल्ह्यासह नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यातील भाविक येत असतात. या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे. मकरसंक्रातीच्या शुभ पर्वावर भरणारी यात्रा चार ते पाच दिवस चालते. या यात्रेत पारंपारिक हस्तकलेने तयार केलेल्या गृहोपयोगी साहित्याची दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते.पूर्वीपासून घोड्यांच्या विक्रीसाठी ही यात्रा प्रसिध्द आहे. परंतु कालांतराने घोडाबाजार मंदावला. दोन ते चार घोड्यांचे दर्शन मात्र होत होते. या यात्रेत अनेक प्रकारची दुकाने थाटली असून लाखो रुपयाची उलाढाल होते. हॉटेल्स, कपड्याची दुकाने, स्वेटर, जॅकेट, चपलांची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, खेळणे, झुले, लोखंडी अवजारे, दगडी पाट्यांची दुकाने, प्रदर्शनी तसेच मुलांना विशेष आकर्षण असलेले ब्रेक डान्स झुला, मौत का कुवा या सार्व प्रकारामुळे यात्रा फुसून जाते. यात्रेकरिता प्रवाशांची जाण्यायेण्याची पध्दतशीर सोय व्हावी म्हणून एस. टी. महामंडळातर्फे ज्यादा बसेसची व्यवस्था केलेली असते.यात्रेत निसर्गाचा सुंदर नजराणा पहावयास मिळत असतो. यात्रेचे भव्य स्वरुप बघता पोलीस प्रशासन बारिक नजर ठेऊन आहे. यात्रेत खरेदी-विक्रीचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असून प्लॉस्टिकचा वापर जास्त प्रमाणात होतो. यात्रेत प्लास्टिकचा वापर होऊ नये व यात्रा प्लास्टिकमुक्त व पर्यावरण पुरक याकरिता बॅनरद्वारे व स्वयंसेवकाद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहे. अशाप्रकारे दुर्गाबाईचे मंदिर हे जागृत देवस्थान असून भाविक मोठ्या भक्तीभावाने येऊन मकरसंक्रातीच्या पर्वावर भरणाºया यात्रेत दुर्गादेवीचे दर्शन घेऊन आर्शिवाद घेतात. चार ते पाच दिवस चालणाºया यात्रेनिमित्त गावात भजन, पूजन, नाटक, कव्वाली असे अनेक मनोरंजनात्मक व जनजागृतीचे कार्यक्रम होत असतात. सदर यात्रा भरण्याचा पूर्वइतिहास असून दुर्गाबाई व त्यांच्या सात भावांनी बांधलेल्या परंतु अर्धवट राहिलेल्या खिंडीचे दर्शन सुध्दा होते. सामाजिक ऐक्य, समरसता व निसर्गाची मुक्त उधळण या यात्रेत पहावयास मिळत असते, हे येथे उल्लेखनीय.डोहाच्या पाणी पातळीत वाढया डोहावर निम्न चुलबंद प्रकल्प तयार झाला असून प्रकल्पाची सर्व दारे बंद करुन पाणी अडविले असल्यामुळे डोहातील पाण्याची पातळी खोलवर गेली असून भरपूर पाणी साचले आहे. त्यामुळे डोहाच्या चारही बाजूला बॅरिकेट्स तयार केले असून डोहाच्या बाजूने आंघोळीकरिता बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक