शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिका नसलेल्यांनाही आता होणार मोफत धान्य पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून असे तीन महिने मोफत धान्य दिले जात आहे. एपीएल, केशरी शिधापत्रिकाधारकांना या सवलतीच्या लाभ मिळाला आहे.

ठळक मुद्देशासनाचा निर्णय । लवकरच होणार धान्याचे वितरण, याद्यांचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ देण्यात येणार आहे. अशा व्यक्तींच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांना धान्य वितरण करण्यात येणार आहे.कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून असे तीन महिने मोफत धान्य दिले जात आहे. एपीएल, केशरी शिधापत्रिकाधारकांना या सवलतीच्या लाभ मिळाला आहे. मात्र, या योजनेचा लाभ विनाशिधापत्रिकाधारकांना देण्यात आला नव्हता. त्यामुळे शिधापत्रिका नसलेले बेघर, स्थलांतरीत कामगार व अडकून पडलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांना हे धान्य मिळण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. अशांंना मोफत तांदूळ देण्यास आता मंजुरी मिळाली आहे. या लाभार्थ्यांना त्यांचा आधारकार्ड नंबर किंवा शासनाकडून देण्यात आलेले कोणतेही ओळखपत्र पाहून धान्य दिले जाणार असून, त्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयाने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.सर्वसामान्यांना मिळणार लाभलाभार्थ्यांच्या याद्या तयार झाल्यानंतर त्या रास्त धान्य दुकानदाराकडे दिल्या जाणार आहेत. त्यानंतर धान्याचे वाटप होणार आहे. राज्यातील लाखो गरीब व गरजू नागरिकांना मोफत धान्याचा लाभ मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे..

टॅग्स :Socialसामाजिक