शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'व्हाईस ऑफ दर्पण' या महिला योजनेच्या नावाखाली ८० लाखांची फसवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:00 IST

पीडित महिलांची पत्रपरिषद : मुख्यमंत्र्यांनी दिले पारडी पोलिसांना चौकशीपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : नुकत्याच पिंडकेपारवरून गाजलेल्या 'पे टू पे' या फसवणूक प्रकरणानंतर आता पुन्हा 'व्हाईस ऑफ दर्पण' या महिला योजनेच्या नावाखाली अनेक महिलांची लाखो रुपयांनी आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. महिलांकडून पैसे गोळा करून मुख्य कार्यालय गुजरातला पाठविले. परंतु, एक वर्ष लोटूनही काहीच फायदा नाही हे बघून आता महिला तक्रारीसाठी पुढे आल्या आहेत. पत्रकार परिषदेतून या फसवणकीच्या प्रकाराची आपबिती मांडत चौकशीची मागणी केली आहे.

देश का सबसे बड़ा आर्थिक सर्व्हे व्हाईस ऑफ योजना दर्पण प्रेस' अशी सोशल मीडियात गुजरातमधून ऑनलाइन माहिती आली होती. यात महिलांना अनुदान ५० हजार देण्याचे प्रलोभन दाखविले गेले. नेमलेल्या एजंटांकडून महिलांकडून प्रत्येकी २०० रुपये जमा करून ही रक्कम गुजरातला क्लिअर व्हिजन फाउंडेशन नं. ५०२०००७९४७३५०१ या एचडीएफसी बँक खात्यात पाठविली.

एकट्या साकोली तालुक्यातील ४० हजार महिलांनी या योजनेत फॉर्म भरले आहेत. त्यानुसार, येथून ८० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. अन्य ठिकाणीही अशाच प्रकारातून रक्कम गोळा होण्याची शक्यता नाकारली जात नाही. दीड ते दोन वर्षे लोटूनही आपल्याला काहीच अनुदान मिळाले नसल्याने या महिलांनी महिला स्थानिक एजंटांच्या घरी जाऊन संपर्क साधला. मात्र, काहीच थांगपत्ता लागत नसल्याने त्यांनी अखेर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत मांडली. यात निशा युवराज उदापुरे (खजरी/डोंगरगाव, ता. सडक अर्जुनी), भाग्यश्री नेपाल (रेंगेपार/दल्ली, जि. गोंदिया) व योगिता हंसराज रामटेके (सावरबंध, ता. साकोली) यांचा समावेश होता.

आपल्यासारख्या फसविल्या गेलेल्या अनेक महिला आहेत. लाडक्या बहिणींना याच योजनेतून पैसे दिले जातात, असे आम्हाला सांगून फॉर्म भरून घेण्यात आले होते, असे या महिलांनी सांगितले. आमच्या संपर्कातील इतर महिलांनाही असेच सांगण्यासाठी आम्हाला सांगण्यात आले होते, अशीही माहिती त्यांनी दिली.

आता लक्ष पोलिसांच्या कारवाईकडेयाप्रकरणी या व्हाईस ऑफ दर्पण ब्युरो चीफ असलेल्या नागपूरच्या एका व्यक्तीने याबाबत मुख्यमंत्री फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पोलिस आयुक्तांकडे तक्रारपत्र दाखल केले होते. या पत्राची दखल घेणारे पत्र मुख्यमंत्र्यांकडून नागपूर पोलिसांना पोहोचले आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

फसवणुकीचे धागेदोरे परप्रांतातया फसवणूक प्रकरणातील धागेदोरे परप्रांतात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. गुजरातमधील संबंधित कंपनीच्या व्यक्तींनी आपल्या हस्तकांमार्फत स्थानिक परिसरातील महिलांना एजंट बनविले. त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील महिलांकडे घरोघरी पाठवून फार्मसह २०० रुपये भरुन घेतले. याप्रकरणाची खोलवर चौकशी केली तर मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांची यात फसवणूक झाल्याने सखोल चौकशीची मागणी होत आहे.

 

टॅग्स :bhandara-acभंडाराsakoli-acसाकोलीfraudधोकेबाजी