शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमध्ये अडकलेले चार विद्यार्थी रोमानियाच्या शिबिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी पाच विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले होते. त्यात मोहाडी तालुक्यातील वरठी येथील हर्षित चौधरी, तुमसर तालुक्यातील खापा येथील विनोद ठवकर, लाखनी येथील श्रेयश चंद्रशेखर निर्वाण, तुमसर येथील निकिता भोजवानी आणि भंडारा शहरातील प्रितीश गिरज पात्रे यांचा समावेश होता. रशिया-युक्रेन युद्धामुळे हे विद्यार्थी अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : युद्ध सुरू असलेल्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भंडारा जिल्ह्यातील पाचही विद्यार्थी सुखरूप असून गुरुवारी चार विद्यार्थ्यांनी रोमानियातील राहत शिबिरात आश्रय घेतला असून एक विद्यार्थिनी भारतात परतल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. येत्या दोन दिवसात चारही विद्यार्थी सुखरूप घरी पोहचणार असल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी पाच विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले होते. त्यात मोहाडी तालुक्यातील वरठी येथील हर्षित चौधरी, तुमसर तालुक्यातील खापा येथील विनोद ठवकर, लाखनी येथील श्रेयश चंद्रशेखर निर्वाण, तुमसर येथील निकिता भोजवानी आणि भंडारा शहरातील प्रितीश गिरज पात्रे यांचा समावेश होता. रशिया-युक्रेन युद्धामुळे हे विद्यार्थी अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. इकडे पालकांचा जीव टांगणीला लागला. या विद्यार्थ्यांनी पायपीट करत कुणी पोलंडची तर कुणी रोमानियाची सीमा गाठली होती. गुरुवारी हरिष चौधरी बुडापेस्टच्या राहत शिबिरात असल्याचे सांगण्यात आले. तर रोमानियाच्या राहत शिबिरात विनोद ठवकर, श्रेयश निर्वाण आणि धीरज पात्रे यांनी आश्रय घेतला आहे. ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना भारतात आणले जाणार आहे. गत आठ दिवसांपासून पालक चिंतेत होते. मात्र गुरुवारी विविध शिबिरात विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.भंडारा जिल्ह्यातील पाच विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून त्यामधील एक विद्यार्थीनी भारतात परतली आहे. उर्वरित चार विद्यार्थी परतीच्या मार्गावर आहेत. मात्र आठ दिवसात त्यांनी युक्रेनमध्ये थरार अनुभवला. पालकही चिंतेत पडले होते. परंतु आता सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

निकिता पोहचली आईकडे रायपूरला

- तुमसरची निकिता भोजवानी ही तुमसरची असली तरी तुमसरला तिचे मामा राहतात. आई-वडील रायपूर येथे असतात. मामाने जिल्हा प्रशासनाला तिची माहिती देऊन मदत मागितली होती. त्यामुळे भंडारा जिल्हा प्रशासनाने निकिताला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रोमानियाच्या विमानतळावरून निकिता भोजवानी गुुरुवारी सकाळी दिल्ली मार्गे रायपूरला आपल्या आई-वडिलांकडे पोहचली. तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. - वरठी येथील सनफ्लॅग कंपनीतील महाव्यवस्थापक अरुणकुमार चौधरी यांचा मुलगा हर्षित सध्या बुडापेस्ट शहरातील शिबिरात आहे. शंभर विद्यार्थ्यांसोबत तो ३५ किलोमीटर अंतर पायी चालत पोलंडच्या सीमेवर शनिवारी पोहचला होता. तेव्हापासून तो पोलंडमध्ये येण्याच्या प्रयत्नात होता. अखेर पोलंड सीमेत त्याला प्रवेश मिळाला. सध्या तो बुडापेस्टच्या शिबिरात असून लवकरच तो भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मुलांच्या वाटेकडे पालकांचे डोळे-  वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्यानंतर युद्धसदृश परिस्थिती अडकलेले विद्यार्थी सुखरूप असल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या वाटेकडे पालकांचे डोळे लागले आहे. कधी आपला मुलगा घरी येतो आणि त्याला पाहतो, असे आई-वडिलांना झाले आहे. युक्रेनमधून पोलंड आणि रोमानियाच्या सीमेपर्यंतचा थरार या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितल्याने ते भयभीत झाले. आपली मुले सुरक्षित येतील की नाही यांची चिंता सतावत होती. आता मुले परत येत असल्याने पालक निश्चिंत झाले आहे.

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी