४९ जखमी : राज्य परिवहन मंडळाकडून अपघातग्रस्तांना ८२ लाखांचे वाटपप्रशांत देसाई - भंडारामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बसने एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात चौघांना आपले प्राण गमवावे लागले, तर ४९ जण जखमी झाले. रापमं कडून या आठ महिन्यात अपघातग्रस्तांना ८२ लाखांचे वाटप करण्यात आले. लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हणून अनेकजण करतात. बस अपघातात विरुद्ध दिशेने आलेल्या किंवा मागून धडक दिलेल्यांना आपले प्राण गमवावे लागले. तर अनेकांना जखमी व्हावे लागले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात चौघांचा मृत्यू झाला असून ३४ व्यक्ती गंभीर जखमी तर ११ किरकोळ जखमी झाल्याची नोंद रापमं भंडारा विभागीय ्रकार्यालयात आहे. अपघातग्रस्तांना रापमं कडून तत्कालीन मदत, पी फॉर्म भरल्यानंतर अपघात नुकसान भरपाई, प्राणांकीत मदत व न्यायालयात दाद मागितल्यानंतर मदत दिली जात असते. अशा या प्रकारात राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागाच्या माध्यमातून ८१ लाख ७५ हजार ८२२ रुपयांची आर्थिक मदत अपघातग्रस्तांना देण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात एक, मे महिन्यात दोन व आॅक्टोबर महिन्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तत्कालीन मदतीच्या माध्यमातून रापमंने ९७ हजार ६०० रुपये, पी फॉर्मच्या माध्यमातून १ लाख ३९ हजार ८८५ रुपये, प्राणांकीत मदत म्हणून २ लाख ९० रुपये तर न्यायप्रविष्ठ प्रकरणांच्या निकालानंतर ७६ लाख ४८ हजार ३३७ रुपये वाटप करण्यात आलेले आहेत. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ पर्यंत भंडारा विभागातील बस अपघातात १० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर ५५ व्यक्ती गंभीर जखमी झाले असून ४२ व्यक्ती किरकोळ जखमी झाले होते. यातील जखमींना ५३ हजार ३०० रुपयांची तातडीची मदत देण्यात आली. तर न्यायालयीन निकालानंतर १२ लाख ५६ हजार रुपये मृतकांच्या नातेवाईकांना देण्यात आले. वाहनचालकावर कारवाईअनेकदा बसचालकाला जबाबदार पकडून निलंबित करण्यात येते. नंतरर त्याची कार्यालयाच्या माध्यमातून विभागीय चौकशी करून त्यात तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करून दंड वसूल करण्यात येते.
आठ महिन्यात बस अपघातात चौघांचा मृत्यू
By admin | Updated: December 13, 2014 22:32 IST