शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

आधारभूत धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रॉनिक काट्यांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

यंदाच्या खरिपात शासनाने  लाखांदूर तालुक्यात जवळपास १४ आधारभूत धान खरेदी केंद्र मंजुर केले आहेत. सदर केंद्र लाखांदूर येथील विजय लक्ष्मी राईस मिल सहकारी संस्था, खरेदी विक्री सहकारी संस्था व मासळ येथील पंचशील भात गिरणी अंतर्गत सुरु करण्यात आले आहेत. गत काळात आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी शासनाने धान खरेदी प्रक्रियेत अनेक बदल केले आहेत.

ठळक मुद्देनांदेड येथील प्रकार : साध्या काट्याने धानाचे मोजमाप, शासन आदेशाची पायमल्ली

  लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शासनाने आधारभूत केंद्रांतर्गत धानाची खरेदी करतांना इलेक्ट्रॉनिक काट्याने मोजमाप करणे बंधनकारक केले आहे. मात्र लाखांदूर तालुक्यात सदर शासन आदेशाची पायमल्ली करीत बहुतांश केंद्रावर इलेक्ट्रॉनिक काट्याऐवजी साध्या काट्याने धानाचे सदोष मोजमाप केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरिपात शासनाने  लाखांदूर तालुक्यात जवळपास १४ आधारभूत धान खरेदी केंद्र मंजुर केले आहेत. सदर केंद्र लाखांदूर येथील विजय लक्ष्मी राईस मिल सहकारी संस्था, खरेदी विक्री सहकारी संस्था व मासळ येथील पंचशील भात गिरणी अंतर्गत सुरु करण्यात आले आहेत. गत काळात आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी शासनाने धान खरेदी प्रक्रियेत अनेक बदल केले आहेत.शेतकऱ्यांकडून शासनाची दिशाभूल टाळण्यासाठी डिजिटल सातबारा यासह धानाचे मोजमाप करतांना इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर बंधनकारक केले आहे. त्यानुसार तालुक्यातील काही केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर केला जात असतांनाच बहुतांश केंद्रावर साध्या काट्यानेच धानाचे मोजमाप केले जात असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.     सदर मोजमाप सदोष केले जात असून प्रती पोती चार ते पाच किलो अधिक वजनाने मोजमाप केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान सदर गैरप्रकार तालुक्यातील नांदेड येथे उघडकीस आला आहे. गैरप्रकारावर आळा घालण्याची  मागणी पिडीत शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड