शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

होळीसाठी वृक्ष तोडाल तर खबरदार; थेट कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 17:06 IST

वृक्षांची तोड करणारे वनविभागाच्या निशाण्यावर आहेत. जंगलातील वृक्षांची तोड केल्यास भारतीय वनअधिनियमान्वये गुन्हा दाखल करून थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे.

ठळक मुद्देवनविभागाची कठोर भूमिका होळीच्या पर्वात गस्त वाढविली, ठिकठिकाणी नाकाबंदी

भंडारा : होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात जंगलातील वृक्षांची कत्तल करून होळी पेटविली जाते. मात्र, आता होळीसाठी वृक्षांची कत्तल महागात पडणार आहे. भंडारा येथे नव्यानेच रुजू झालेल्या उपवनसंरक्षकांनी खास आदेश काढून वृक्षतोड करणाऱ्यांची थेट कारागृहात रवानगी करण्याचे निर्देश दिले. यासोबतच आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांची गस्त वाढवून ठिकठिकाणी नाकाबंदी व वाहन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरवर्षी परंपरेनुसार होळी साजरी केली जाते. होळीत वृक्षांची कत्तल करून त्यांचे दहन केले जाते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, प्रदूषणही होते. याला आळा घालण्यासाठी उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी कठोर पावले उचलली आहेत. वृक्षपूजनाने होळी साजरी करा असे वारंवार आवाहन केल्यानंतरही वृक्षांची तोड केली जाते. मात्र, यंदा अशी वृक्षांची तोड करणारे वनविभागाच्या निशाण्यावर आहेत. जंगलातील वृक्षांची तोड केल्यास भारतीय वनअधिनियमान्वये गुन्हा दाखल करून थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे. तसेच मालकी क्षेत्रातील वृक्षतोड करणाऱ्यांवर महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश उपवनसंरक्षक गवई यांनी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले आहेत. नाकाबंदी, वाहन तपासणी करण्यात येणार असून संयुक्त वनव्यवस्थापन समितीचीही यासाठी मदत घेतली जाणार आहे.

१६२ नियतक्षेत्रात गस्त

भंडारा जिल्ह्यात ९२७ चौरस किलोमीटरचे जंगल आहे. या जंगलाचे १० रेंजमध्ये विभाजन करण्यात आले. ३९ राऊंड आणि १६२ नियतक्षेत्र (बीट) आहेत. या सर्वच क्षेत्रात गस्त वाढविण्याची सूचना देण्यात आली आहे. होळीपूर्वी व होळीनंतर दोन ते तीन दिवस संवेदनशील क्षेत्रामध्ये गस्त घालण्याचे निर्देश दिले असून प्रादेशिक वनक्षेत्रासोबतच इतर जंगलात वाहनाद्वारे विशेषत: रात्री गस्त वाढविण्यात आली आहे.

शिकाऱ्यांवर वनविभागाची करडी नजर

वृक्षतोडीसोबतच धूलिवंदनाच्या दिवशी मांसाहार करणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशा अवैध शिकारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त वाढविण्यात आली आहे. संवेदनशील क्षेत्रासोबतच वन्यप्राण्यांच्या शिकारी झालेल्या परिसरात ही गस्त राहणार आहे. तसेच विजेच्या प्रवाहाने शिकार झालेल्या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले.

होळीचा सण पर्यावरणाचा विचार करून सर्वांनी साजरा करावा. वृक्षतोड करून होळी साजरी करण्यापेक्षा वृक्ष पूजनाने होळी साजरी करावी. वृक्षतोड करताना कुणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

राहुल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा.

टॅग्स :environmentपर्यावरणHoliहोळी 2022forest departmentवनविभागbhandara-acभंडारा