शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर येथे विदेशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

लाखांदूर तालुक्यात टाकलेल्या छाप्यात एका बार मालकाला विदेशी दारूसाठा अवैधरित्या पुरवताना रंगेहात पकडले. यामध्ये बारमालकाकडून विदेशी दारूच्या १४ पेट्या, चार चाकी बोलेरो गाडी असा एकूण नऊ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने लाखांदूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. लाखांदूर शहरात देशी दारूविक्रते व बारची मोठी संख्या असून १४ हजार लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होते.

ठळक मुद्देदारू विक्रेत्यांमध्ये भरली धडकी : १४ पेट्यांसह नऊ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या धाडीत दारु विक्रेत्यांकडून विदेशी दारू किंमत नऊ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नाकेबंदी करून कुठेही अवैध प्रकार होणार नाही, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे घातले.लाखांदूर तालुक्यात टाकलेल्या छाप्यात एका बार मालकाला विदेशी दारूसाठा अवैधरित्या पुरवताना रंगेहात पकडले. यामध्ये बारमालकाकडून विदेशी दारूच्या १४ पेट्या, चार चाकी बोलेरो गाडी असा एकूण नऊ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने लाखांदूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.लाखांदूर शहरात देशी दारूविक्रते व बारची मोठी संख्या असून १४ हजार लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होते. यावेळी अचानक टाकलेल्या धाडीमध्ये बारमालकाकडून विदेशी दारूसह अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लाखांदूर तालुक्याच्या सीमेलगतच दारुबंदी असलेले चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात दारूचा अवैध साठा पुरवित असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच विभागाच्या भरारी पथकाने अचानक धाड टाकून ही कारवाई केली.गाडीचालक महेश दीपक कावळे (२३) रा. वडसा असे गुन्ह्यातील आरोपीचे नाव असून सदर दारू लाखांदूर येथील एका बारमधून घेवून वडसाकडे जात असल्याची माहिती चालकाने दिली. सदर चालकावर गुन्हा दाखल करुन त्याला न्यायालयात हजर केले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.ही कारवाई अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक र.दा. पाटणी, दुय्यम निरीक्षक सुषमा कुंभरे, एस.डी. लांबट, न.सा. उमेनवर, जवान शिंदपुरे, नागदे यांनी कारवाई केली. अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना याबाबत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.ठेवली होती पाळतनववर्षाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची मागणी असते. याचाच फायदा घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठिकठिकाणी भरारी पथके स्थापन करून कुठेही अवैधरित्या जिल्ह्यातून परजिल्ह्यात दारू वाहतूक होणार नाही यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली होती. सलग दोन दिवस पाळत ठेवून अखेर शनिवारी रात्री लाखांदूरातून वडसाकडे १४ पेट्या घेवून जात असलेल्या चार चाकी बोलेरे क्रमांक एमएच ३३ ए ३९६१ या गाडीसह विदेशी १४ दारूपेट्यांसह चालकाला पकडले.

टॅग्स :Policeपोलिस